
How to Make Kandil at home for Diwali 2025: दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. या दिवशी रोषणाई केली जाते आणि या रोषणाईतील महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे कंदील. 'आकाश' कंदील हा शब्द हळूहळू फक्त 'कंदील' म्हणून बोली भाषेत रूढ झाला. हा कंदील जमिनीवर ठेवत नाही तर तो टांगला जातो, ज्यामुळे त्याला आकाश कंदील म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी जेव्हा घरोघरी वीज पोहोचली नव्हती तेव्हा रॉकेलवर पेटणारे कंदील असायचे. ते कंदील आणि दिवाळीचे कंदील यात फरक हाच आहे की रॉकेलवरील कंदील टांगण्याची किंवा जमिनीवर ठेवण्याची सोय होती, दिवाळीतील कंदील मात्र उंचावरच टांगला जातो आणि हाच या दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. पारंपरीक कंदील हा रंगीबेरंगी कागद आणि बांबूच्या काटक्यांपासूनच बनवला जातो. मात्र काळानुसार कागदाची जागा प्लॅस्टीकने घेतली आणि प्लॅस्टीकचेही कंदील बाजारात दिसू लागले. काळानुसार कंदिलाच्या रुपातही फरक पडला आणि हल्ली विविध आकारांचे रंगाचे कंदील बाजारात पाहायला मिळतात. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा अनेकांचा निर्धार असतो त्यामुळे आजही ही मंडळी प्लॅस्टीकच्या कंदिलापेक्षा कागदापासून बनवलेले कंदील घेणे पसंत करतात.
नक्की वाचा: काळ्या रंगाचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर पांढरे डाग राहतात का?
घरच्या घरी कंदील कसा बनवायचा?
पूर्वीच्या काळी बाजारातून कंदील खरेदी करण्याची प्रथा नव्हती. घरीच कंदील बनवले जायचे. आपण बनवलेला कंदील जेव्हा वाऱ्याच्या मंद झुळूकेसोबत डुलतो तेव्हा ते दृश्य पाहून मनाला खूप समाधान वाटतं. घरच्या घरी कंदील बनविणे हे किफायतशीर असते आणि घरातल्याच वस्तू वापरून किंवा बाजारात फार कमी किंमतीत मिळणाऱ्या वस्तू वापरून आपण कंदील तयार करू शकतो. हे कंदील बनवायला फार कष्टही लागत नाहीत आणि फार वेळही लागत नाही. घरच्याघरी सोप्या पद्धतीने कंदील कसा बनवण्याच्या 5 सोप्या आयडिया आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
नक्की वाचा: कच्चं खोबरं खाण्याने काय होतं? जाणून घ्या याचे अद्भुत फायदे
झिरमिळ्यांचा गोलाकार कंदील (How to make kandil with craft paper)
प्लॅस्टीकची बॉटल वापरून बनवा घरच्या घरी कंदील (How to Make Kandil Using Plastic Bottle)
घरच्या घरी पारंपरीक कंदील कसा बनवायचा ? (How to Make Traditional Kandil at Home?)
हा फॅन्सी कंदील तर लहान मुलंही बनवू शकतील (Fancy Kandil Idea for kids)
घरच्या घरी चांदणी कंदील कसा बनवायचा ? (How To make Star Kandil at Home?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world