जाहिरात

Diwali 2025: धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत, दिवाळी सणाचे संपूर्ण कॅलेंडर, शुभ मुहूर्त मिळवा एका क्लिकवर

Diwali 2025 Calendar: धनसंपत्ती, आनंद, सौभाग्य आणि आरोग्याशी संबंधित दिवाळीतील पाच सण कधी आहेत? कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर कोणत्या देवतांची पूजा करावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Diwali 2025: धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत, दिवाळी सणाचे संपूर्ण कॅलेंडर, शुभ मुहूर्त मिळवा एका क्लिकवर
"Diwali 2025 Calendar: दिवाळी सणांची माहिती एका क्लिकवर मिळवा"
Canva

Diwali 2025 Calendar: हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाचे अतिशय महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीपासून ते कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीपर्यंत दिवाळी सण साजरा केला जातो. काही जण धनत्रयोदशीचा दिवाळीमध्ये समावेश करत नाही. दुसरीकडे वसुबारस आणि भाऊबीज हे सणही दिवाळी सणाला जोडून येतात म्हणून हे दिवसही बहुतांश मंडळी दिवाळी म्हणून साजरी करतात. श्री राम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्यानगरीत पुन्हा आले होते, त्यावेळेस प्रजेने दीपोत्सव करुन आनंद साजरा केला जातो. तेव्हापासून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. यंदा कोणते सण कोणत्या दिवशी आहेत? शुभ मुहूर्त काय आहेत? एका क्लिकवर संपूर्ण माहिती जाणून घेऊया...

1. वसुबारस (Vasubaras 2025)

आश्विन वद्य द्वादशी तिथीला वसुबारस साजरी केली जाते. यंदा 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस आहे. पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 9.46 पासून ते संध्याकाळी 5.46 वाजेपर्यंत आहे.  

2. धनत्रयोदशी 2025 (Dhanteras Kadhi Ahe? Dhantrayodashi Kadhi Ahe?) 

आश्‍विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवन धन्वंतरी यांची जयंती. यंदा 18 ऑक्टोबर 2025 रोजी (शनिवार) धनत्रयोदशी आहे. या दिवशी भगवान कुबेरसह धन्वंतरी देवतेचीही विशेष स्वरुपात पूजा केली जाते, ज्याद्वारे सुख-सौभाग्य आणि आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. धनत्रयोदशीला नवीन वस्तू खरेदी करण्याचीही परंपरा आहे. 
धनत्रयोदशीला पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त  

  • सकाळी 9.03 वाजेपासून ते सकाळी 9.30 वाजेपर्यंत आहे. 
  • दुपारी 1.50 वाजेपासून ते संध्याकाळी 4.45 वाजेपर्यंत आहे. 
  • संध्याकाळी 6.12 वाजेपासून ते संध्याकाळी 7.45 वाजेपर्यंत आहे.

3. नरक चतुर्दशी 2025 (Narak Chaturdashi 2025 Kadhi Ahe?)

आश्‍विन महिन्यातील वद्य चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी आहे, काही लोक या दिवसास छोटी दिवाळी असेही म्हणतात. यंदा 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. पौराणिक कथेनुसार नरकासूर राक्षसाचा वध करण्यात आला होता. यानिमित्ताने दिवाळी सणाच्या या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. काही लोक यास पहिली आंघोळ असेही म्हणतात. काही लोक अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट फळ डाव्या पायाच्या अंगठ्याने ठेचून फोडतात, त्याचा रस जिभेला लावून आणि फळाची बी कपाळावर लावतात.   

4. लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2025 Kadhi Ahe)

आश्विन महिन्यातील अमावास्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भगवान विष्णू (Bhagwan Vishnu) यांनी देवी लक्ष्मीसह (Lakshmi Devi) सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केल्यानंतर सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी पौराणिक कथा आहे.  संध्याकाळी शुभ मुहूर्तानुसार लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी श्री गणेशासह कुबेर देवता आणि धनाची देवी लक्ष्मीमातेची विशेष पूजा केली जाते. यंदा काही तज्ज्ञमंडळींनी माहितीनुसार 20 ऑक्टोबर तर काहींनी 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे तुम्ही जे पंचांग फॉलो करता त्यानुसार किंवा तुमच्या गुरुंजींची माहितीनुसार लक्ष्मीपूजन करावे.

Lakshmi Puja 2025 Date And Time: लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती? 20 की 21 ऑक्टोबर? शुभ मुहूर्तही जाणून घ्या

(नक्की वाचा: Lakshmi Puja 2025 Date And Time: लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती? 20 की 21 ऑक्टोबर? शुभ मुहूर्तही जाणून घ्या)

5. बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2025)

कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीला बलीप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जातो. दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर अनेक शुभ कार्य केली जातात. बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा यंदा 22 ऑक्टोबर रोजी आहे. 

  • शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 9.30 वाजेपर्यंत आहे. 
  • दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10.56 वाजेपासून ते दुपारी 12.23 वाजेपर्यंत आहे. 
  • तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी 4.24 वाजेपासून ते 6.09 वाजेपर्यंत आहे. 

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या

(नक्की वाचा: Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या)

6. भाऊबीज 2025 (Bhaubeej 2025/Bhai Dooj 2025) 

कार्तिक शुद्ध द्वितीया तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाचे औक्षण करुन त्याच्या प्रगती, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी आहे. 

  • अभिजीत मुहूर्त सकाळी 11.59 वाजेपासून ते दुपारी 12.46 वाजेपर्यंत आहे. 
  • विजय मुहूर्त दुपारी 2.18 वाजेपासून ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत आहे.
  • निशिता मुहूर्त रात्री 11.50 वाजेपासून ते उत्तररात्री 12.48 (AM)(24 ऑक्टोबर)  वाजेपर्यंत आहे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com