पुण्यात हवेची गुणवत्ता खालावली असल्याचं दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी फटाके फोडले जात आहेत. परिणामी पुण्यात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित झाली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीने शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. शहरातील अनेक भागातील हवा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. शुक्रवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर शहर आणि उपनगरांमध्ये हवेची गुणवत्ता 115 निर्देशंकावर पोहोचली आहे.
दरम्यान यंदाच्या वर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या उलाढालीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी फटाक्यांच्या विक्रीमध्ये घट झाल्याचं फटाके विक्रेत्यांचा म्हणणं आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होत होती, यावर्षी त्यावर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासाठी कारणीभूत ठरलेल्या गोष्टी म्हणजे चायनीज फटाके आणि त्यासोबतच दिवसेंदिवस प्रदूषणाच्या बाबतीत निर्माण होणारी जागरूकता. काही ठिकाणी लोकांना फटाके फोडण्याचं टाळलं. मात्र असं असलं तरीही हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा - खळबळजनक! एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे आणि गन पावडर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक पुढीलप्रमाणे :
शिवाजीनगर – 254
भूमकरनगर – 174
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – 298
कर्वे रस्ता – 209
हडपसर – 281
लोहगाव येथील म्हाडा कॉलनी – 154
पंचवटी – 196
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world