
Lakshmi Puja 2025 Date And Time: दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनास विशेष महत्त्व असते. दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. यंदा लक्ष्मी पूजनाच्या तारखेवरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. ज्योतिषी क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजा करण्याचा सल्ला दिलाय. त्यानुसार लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा मांडणी, पूजा साहित्य, विशेष मंत्र यासह अन्य गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
आश्विन अमावस्या तिथी 2025 | Ashwin Amavasya 2025 Tithi | Diwali 2025 Amavasya Tithi
- 20 ऑक्टोबर 2025 रोजी अमावस्या तिथीस दुपारी 3.44 वाजता प्रारंभ होतोय.
- 21 ऑक्टोबर 2025 रोजी अमावस्या तिथी संध्याकाळी 5.54 वाजता समाप्त होतेय.
- तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत आहे.
लक्ष्मी पूजन 2025 कधी आहे? | 21 October Lakshmi Puja 2025 | Lakshmi Puja 2025 On 21 October
वास्तुशास्त्रज्ज्ञ सचिन मधुकर परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार
- लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त 21 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6.10 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेपर्यंत आहे.
- यानुसार पूजेसाठी एकूण 2 तास 30 मिनिटे कालावधी मिळणार आहे.
- संध्याकाळी 7.44 वाजेपासून ते रात्री 9.17 वाजेपर्यंत चौघडी लाभ कालावधी आहे.
- यानुसार पूजेची सर्व तयारी आधीच करुन प्रत्यक्ष पूजनविधी, मंत्रजप, साधना, प्रार्थना या मुख्य विधी संध्याकाळी 7.44 वाजेपासून ते रात्री 8. 40 वाजेपर्यंत करावे.
- याच काळात वृषभ हे स्थिरलग्नही आहे. लक्ष्मीपूजन विधी होत असताना चांगली चौघडी आणि स्थिर लग्न दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात.
ज्योतिषी विशाल तर्टे यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार
लक्ष्मी पूजनामध्ये या गोष्टी असणं आवश्यक | Lakshmi Puja 2025 Samagri
लक्ष्मी पूजनादिवशी पूजेसाठी अष्टदल कमल किंवा स्वस्तिक, अक्षता, धूप-दीप, नैवेद्य (लाडू, मिठाई, फळे, धने, लाह्या) आणि आरतीचे साहित्य यासारख्या गोष्टी पूजेमध्ये असाव्यात. तसेच गणपती देवता, भगवान कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा, काही पारंपरिक पदार्थ जसे की शिंगाडा, करंजी, सीताफळ इत्यादी गोष्टींचा समावेश करावा.
लक्ष्मी पूजेची सामग्री | Lakshmi Puja 2025 Samagri List
- देवतेच्या मूर्ती/प्रतिमा : लक्ष्मीमाता आणि कुबेर देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा.
- अक्षता आणि फुले : अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक.
- पूजेची भांडी : तांब्या-पळी इत्यादी.
- नैवेद्य : पंचामृत, धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बतासे, श्रीफळ, फळे, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, रव्याचा शिरा, सीताफळ आणि केशर मिठाई.
- धूप-दीप : धूप, दीप आणि अगरबत्ती.
- आरतीसाठी : तेलाचा दिवा, घंटा.
- इतर : तांबूलम (विडा), प्रवाळ, लवंग, वेलची आणि साखर घालून बनवलेला खवा.
(नक्की वाचा: Lakshmi Puja 2025 Wishes: लक्ष्मीमाता सोनपावलांनी येवो तुमच्या घरी, लक्ष्मी पूजनाच्या पाठवा मंगलमय शुभेच्छा)
लक्ष्मी पूजन कसे करावे? | Lakshmi Puja 2025 Puja Vidhi
- सुरुवात: लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती किंवा प्रतिमा अष्टदल कमळावर किंवा स्वस्तिकावर स्थापित करा.
- मंत्रोच्चार: "ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मये नमः" या मंत्राचा जप करा.
- पंचामृत स्नान: पंचामृताने देवीची पूजा करा.
- धूप-दीप: धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवा.
- नैवेद्य अर्पण करावा.
- दिवा प्रज्वलित करून लक्ष्मीमातेची आरती करा.
- आरतीनंतर देवीला घरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रार्थना करावी आणि क्षमायाचना करावी.
दाते पंचांगाच्या इन्स्टाग्राम पेजवरील व्हिडीओ देखील ऐका
लक्ष्मी पूजन : पूजेची मांडणी कशी करावी? पाहा ही इन्स्टा पोस्ट | Lakshmi Puja 2025 Puja Rituals
वास्तुशास्त्रज्ज्ञ सचिन मधुकर परांजपे यांनी काही प्रभावी मंत्रांसह रमाहृदय स्तोत्रम् याचेही पठण करण्याचा सल्ला दिलाय.
श्रीः पद्मा कमला मुकुन्दमहिषी लक्ष्मीस्त्रिलोकेश्वरी मा क्षीराब्धिसुता विरिञ्चिजननी विद्या सरोजासना । सर्वाभीष्टफलप्रदेति सततं नामानि ये द्वादश, प्रातः शुद्धतराः पठन्त्यभिमतान् सर्वान् लभन्ते शुभान् ॥
नामावलिः
ॐ श्री श्रियै नमः ।
ॐ श्रीपद्मायै नमः ।
ॐ श्रीकमलायै नमः ।
ॐ श्रीमुकुन्दमहिष्यै नमः ।
ॐ श्रीलक्ष्म्यै नमः ।
ॐ श्रीत्रिलोकेश्वर्यै नमः ।
ॐ श्रीमायै नमः ।
ॐ श्रीक्षीराब्धिसुतायै नमः ।
ॐ श्रीविरिञ्चिजनन्यै नमः ।
ॐ श्रीविद्यायै नमः ।
ॐ श्रीसरोजासनायै नमः ।
ॐ श्रीसर्वाभीष्टफलप्रदायै नमः ।
इति रमाहृदय स्तोत्रं सम्पूर्णम् ।
श्री लक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र
1. ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)
2. ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:
3. ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
4. ॐ ह्रीम पद्मे स्वाहा
5. ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:
6. ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:
7. ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे
डॉ. रूचा पै यांनी सांगितलेले लक्ष्मी पूजनातील प्रसादाचे महत्त्व | Lakshmi Puja 2025 Prasad Importance
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world