What To Do If Vaccination Of Child Missed: पालकांनो तुम्हाला तुमच्या मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक पाळणे अवघड जातेय का? तुम्हाला माहिती आहे का, एखादे लसीकरण चुकल्यास मुलं गंभीर संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकतात आणि त्यांच्या एकुण आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम देखील होऊ शकतो. मात्र आता काळजी करू करण्याचे कारण नाही आपण कॅच-अप लसीकरण म्हणजेच चुकलेले एखादे लसीकरण पूर्ण करून मुलांना आवश्यक ते संरक्षण पुरविणे. यामुळे केवळ मुलांचे आरोग्य सुरक्षित राहत नाही तर रोगराई पसरण्यासही आळा बसतो, याबाबतच डॉ. अमर भिसे, सल्लागार - पीआयसीयू (बाल अतिदक्षता विभाग), नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (Vaccination Of Child Special Story)
तज्ज्ञांच्या मते, मुलांचे आरोग्य आणि दर्जेदार जीवनमान राखण्यासाठी कॅच-अप लसीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे पालकांनी आपल्या डॉक्टरांशी बोलून यासंदर्भातील सर्व शंका दूर कराव्यात आणि विलंब न करता मुलांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हे मुलांना गंभीर आजारांपासून वाचविण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र ठरत आहे.
आजारपण, प्रवास किंवा जागरूकतेचा अभाव अशा विविध कारणांमुळे बऱ्याच मुलांचे लसीकरण चुकते. अशा वेळी कॅच-अप लसीकरणाने ही उणीव भरून काढता येते. नवजात बाळ, शाळकरी मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी हे लसीकरण अतिशय आवश्यक मानले जाते. पालकांनी वेळीच लसीकरण करून मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. (Child Vaccination Health Tips)
वयोगटानुसार आवश्यक लसीकरण| Required Vaccinations By Age Group
१. नवजात व लहान मुले (जन्मजात बाळापासून ते २ वर्षांपर्यंतचे मुल)| (Newborns and young children Group)
कॅच-अप लसीकरणातील लस| Vaccines in catch-up vaccination:
डीटीएपी (डिप्थेरिया, टिटॅनस, पर्टसिस)
हिब (हॅमॉफिलस इन्फ्लूएंझा टाईप बी
पोलिओ
हिपॅटायटीस बी
रोटाव्हायरस
पीसीव्ही१३ (न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस)
लसीकरणाचे फायदे| Benefits of Newborn Group vaccination
हा वयोगट अधिक संवेदनशील असतो. या काळात एखादी लस चुकल्यास बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळीच लसीकरण करणे किंवा लसीकरण चुकल्यास आणखी विलंब न करता लसीकरणे पूर्ण करणे गरजेचे आहे.
2. ३ ते १८ वर्षे वयोगटातील मुले| Children aged 3 to 18 years
कॅच-अप लसीकरणातील लस
एमएमआर (गोवर, गलगंड, रुबेला) – दोन डोस आवश्यक; बहुतांश प्रकरणात दुसरा डोस चुकतो.
व्हॅरिसेला (चिकनपॉक्स) – दुसरा डोस अनेकदा राहून जातो.
टीडॅप (टिटॅनस, डिप्थेरिया, पर्टसिस) – ११ ते १२ वयात बूस्टर डोस आवश्यक.
एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) – ११-१२ वयात पहिला डोस दिला जातो; या वयात लसीकरण न झाल्यास २६ वयापर्यंत लसीकरण करता येऊ शकते.
मेनिंगोकॉकल लस – किशोरवयीन मुलांमध्ये मेंदूज्वरापासून संरक्षणासाठी ही लस आवश्यक आहे.
काय आहेत फायदे?| Know Benefits
या वयोगटातील लसीकरण शालेय प्रवेशासाठी तसेच मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या लसींमुळे शाळा व तसेच सामाजिक ठिकाणी संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखता येतो. कॅच-अप लसीकरण हे बालआरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. नवजात बाळ, लहान मुलं, शाळकरी किंवा किशोरवयीन मुलं अशा प्रत्येक वयोगटासाठी हे चुकलेली लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, गंभीर आजार टळतात आणि रोगांचा प्रसारही थांबतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world