सर्व प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही, अशा तक्रारी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. अशा परिस्थितीत ती व्यक्ती आपल्या शरीराला खूप त्रास देऊ लागते आणि परिणामी त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे इत्यादी समस्या सुरू होतात. जर वजन कमी होत नसेल तर त्याचे कारण काय आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे.
हेल्थलाइननुसार, अनेक वेळा वर्कआउट रूटीन फॉलो करूनही वजन कमी होत नाही. मात्र कंबरेपासून जर तुमचे कपडे सैल होत असतील, आणि तरीही वजनात काहीच फरक दिसत नसेल. तर अशावेळी तुमची चरबी कमी होत असते मात्र स्नायू वाढत असल्याने वजनात फरत दिसत नसेल. त्यामुळे काळजी करू नका आणि तुमची दिनचर्या पाळत राहा.
वजन कमी करण्यासाठी आहारातील कॅलरीजचं संतुलित महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही जास्त कॅलरीजचे पदार्थ खात असाल तर व्यायाम करून त्या बर्न कराव्या लागतील. असे न केल्यास वजन कमी होणार नाही. जास्त व्यायाम केला म्हणून त्या दिवशी जास्त खाण्याची सवय सोडून द्या. अन्यथा वजनात फारसा फरक दिसणार नाही.
जर तुम्हाला डायटिंग करून वजन कमी करायचं असेल तर त्यामुळे तुमचे शरीर कमकुवत होईल आणि आरोग्याच्या समस्या वाढतील. वजन कमी करण्यासाठी वेट लिफ्टींग आवश्यक आहे, असे केल्याने चयापचय प्रक्रिया वाढते, स्नायूंचं सुदृढ होतात आणि चरबी वेगाने कमी होते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ आणि फायबरचा समावेश करा. असे केल्याने पोट भरलेले राहते, चयापचय गती वाढते आणि पुन्हा वजन वाढण्याचा धोकाही कमी होतो.
वजन कमी केल्यानंतर तुमचे वजन पुन्हा वाढत असेल, तर याचे मुख्य कारण म्हणजे तुमचा आहाराबाबत निष्काळजीपणा असू शकतो. खरं तर, बरेच लोक गोड पदार्थ किंवा जास्त कॅलरी असलेले अन्न खाऊन स्वत:ला ट्रिट देतात किंवा चीट डे साजरा करतात. परंतु ही पद्धत आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
एवढेच नाही तर, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्याची समस्या असेल किंवा व्यायाम करताना तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना संपूर्ण माहिती द्या आणि आवश्यक चाचण्या करूनच वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.