जाहिरात

Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीला रांगोळी काढून करा बाप्पाचं स्वागत, पाहा 13 अत्यंत सुंदर डिझाइन

Ganesh Chaturthi 2025: येथे आम्ही तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि जलद बनवता येणाऱ्या रांगोळीच्या डिझाईन्स घेऊन आलो आहोत.

Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीला रांगोळी काढून करा बाप्पाचं स्वागत, पाहा 13 अत्यंत सुंदर डिझाइन
गणेश चतुर्थीला अंगणात काढा सुंदर रांगोळी

Ganesh Chaturthi 2025: संपूर्ण भारतात गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशभक्त गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतात आणि त्यांची भक्तीभावाने पूजा करतात. यावर्षी गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट, बुधवारी आहे आणि गणपती विसर्जन 6 सप्टेंबर शनिवारी होईल. अशा परिस्थितीत, सर्वजण मोठ्या आनंदाने बाप्पाचं स्वागत करण्यात व्यस्त आहेत.

बाप्पाच्या स्वागतासाठी लोक नवीन पदार्थ बनवतात, नैवेद्य तयार करतात, घर स्वच्छ करतात आणि सुंदर सजावट करतात. तसेच काही लोक घराच्या अंगणात रांगोळी देखील काढतात. हिंदू धर्मात (Rangoli design for Ganesh Chaturthi) रांगोळी काढण्याचं विशेष महत्त्व आहे. मंगलकार्यावेळी अंगणात रांगोळी काढली जाते. अशा परिस्थितीत, आम्ही तुमच्यासाठी काही अतिशय सुंदर आणि लवकर काढता येतील अशा रांगोळी डिझाइन घेऊन आलो आहोत. यापैकी तुम्हाला हव्या त्या डिझाइनने तुमचं अंगण सजवू शकता. 

Ganesh Chaturthi Wishes: गणपति आगमन की सभी को दें बधाई, भेजिए गणेश चतुर्थी की ये खास शुभकामनाएं

गणेश चतुर्थीला अंगणात काढा या रांगोळी डिझाइन l Rangoli design for Ganesh Chaturthi

गणपतीसाठी रांगोली


तुम्ही रांगोळीत गणपती बाप्पाची लहानची प्रतिमा काढू शकता. अशा प्रकारची रांगोळी सहजपणे काढता येते. याशिवाय दिसायला ही रांगोळी अत्यंत सुंदर दिसते.

फुलांची रांगोळी 

फुलांची रांगोळी अत्यंत सुंदर दिसते. अशात तुम्ही झेंडुची फुलं, कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांपासून रांगोळी तयार करू शकता. 

मोराची डिजाइन असलेली रांगोळी

मोराची डिझाइन असलेली रांगोळी खूप सुंदर दिसते. तुम्ही दिलेल्या डिझाइनपैकी कोणत्याही एकाची निवड करू शकता.  

स्वस्तिक आणि ओम रांगोळी

स्वस्तिक आणि ओमचे चिन्ह शुभ मानले जातात. बाप्पाच्या स्वागतात तुम्ही स्वस्तिक आणि ओमची रांगोळी काढू शकता.  

दिव्यांची रांगोळी

वर दिल्याप्रमाणे तुम्ही दिव्यांची रांगोळी काढू शकता. विविध रंग भरून त्याच्या चारही बाजूला छोटे-छोटे दिवे लावा. ज्यामुळे रांगोळी अधिक सुंदर दिसेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com