जाहिरात

Ramabhadracarya Vs Premanand Ji Maharaj:संस्कृतातील किमान 1 श्लोक म्हणून दाखवा! विराट कोहलीच्या गुरुंना आव्हान

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराज यांचे सत्संग (Premanand Ji Maharaj Satsang) आणि त्यांच्या अनुयायी असलेल्या सेलिब्रिटींमुळे ते सतत चर्चेत असतात. यामध्ये राज कुंद्रा आणि विराट कोहलीसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.

Ramabhadracarya Vs Premanand Ji Maharaj:संस्कृतातील किमान 1 श्लोक म्हणून दाखवा! विराट कोहलीच्या गुरुंना आव्हान

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराज यांचे सत्संग (Premanand Ji Maharaj Satsang) आणि त्यांच्या अनुयायी असलेल्या सेलिब्रिटींमुळे ते सतत चर्चेत असतात. यामध्ये राज कुंद्रा आणि विराट कोहलीसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. नुकतेच राज कुंद्रा यांनी प्रेमानंद महाराजांना आपली किडनी दान करण्याची ऑफर दिली, ज्यावर भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव याने हा 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचे म्हटले. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीने जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्याशी संवाद साधला, ज्यांनी या विषयावर अत्यंत स्पष्टपणे आपली मते मांडली.

रामभद्राचार्य म्हणाले की, प्रेमानंद हे माझ्यासाठी बालकासमान आहेत आणि ते त्यांना चमत्कारी मानत नाहीत. "तो माझ्यासमोर संस्कृतचा एक शब्द बोलून दाखवू दे किंवा माझ्या श्लोकांचा अर्थ समजावून सांगू दे," असे आव्हानच त्यांनी दिले. "किडनीचे डायलिसिस तर होतच राहते, त्याला जे करायचे आहे ते करू द्या," असेही ते म्हणाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "विद्वान आणि चमत्कारी तोच असतो, ज्याला शास्त्रांचे ज्ञान असते." अनेक मोठे सेलिब्रिटी त्यांच्याकडे केवळ आपली 'इमेज' सुधारण्यासाठी जातात, असेही त्यांनी म्हटले.

नक्की वाचा - Sadhvi Ritambhara: 'हिंदू मुली नग्न होऊन पैसे कमवतात', साध्वी ऋतंभरांचा video viral

रामभद्राचार्य यांनी स्पष्ट केले की, प्रेमानंद यांच्याबद्दल त्यांच्या मनात कोणताही द्वेष नाही, परंतु ते त्यांना विद्वान किंवा चमत्कारी मानत नाहीत. "चमत्कार त्याला म्हणतात, जो शास्त्रांवर चर्चा करतो." प्रेमानंद यांच्या लोकप्रियतेवर त्यांनी म्हटले, "त्यांची लोकप्रियता चांगली आहे, पण ती काही काळासाठीच असते. तो चमत्कारी आहे, हे मला मान्य नाही."

रामभद्राचार्य यांनी महात्मा गांधींच्या विचारांवरही जोरदार टीका केली. गांधीजींचा 'सर्व धर्म आणि जाती समान आहेत' हा विचार त्यांना मान्य नाही. "मोठे लोक कधी कधी अशा चुका करतात," असे ते म्हणाले. त्यांच्या मते, देशाच्या फाळणीला गांधीजीच जबाबदार होते, कारण ते जवाहरलाल नेहरूंच्या चुकांकडे दुर्लक्ष करत होते. गांधीजींचा 'सर्व धर्म, सर्व जाती समान आहेत' हा विचार आपल्याला मान्य नसल्याचेही ते म्हणालेगांधीजींना जवाहरलाल नेहरू खूप प्रिय होते आणि त्यामुळे ते त्यांच्या चुका सहन करत होते, असे जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी म्हटले. त्यांनी इतिहासाचा संदर्भ देत म्हटले की, "आक्रमण नेहमी मुस्लिमांकडून आणि ख्रिश्चनांकडून झाले आहे." त्यांनी अकबराच्या 'मीनाबाजार'चा उल्लेख करत म्हटले की, हा मीनाबाजार भरवून अकबराने हजारो महिलांची अब्रू लुटली होती.  गांधीजींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान चांगले होते, पण ते केवळ 1% होते, तर इतर क्रांतिकारकांचे योगदान 99% होते, असेही ते म्हणाले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com