Viral Video: आयब्रोज करायला गेली अन् लिवर फेल करून आली, थ्रेडिंगमुळे गंभीर आजाराचा धोका? डॉक्टरांचा मोठा दावा

Viral Video: आयब्रोज करायला गेलेल्या तरुणी चक्क लिवर निकामी झाल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका डॉक्टरने शेअर केलाय. नेमके काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.

जाहिरात
Read Time: 2 mins
Viral Video: थ्रेडिंगमुळे गंभीर आजार होऊ शकतात?
Canva

Viral Video: चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी, भुवयांना आकार देण्यासाठी कित्येक महिला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग ट्रीटमेंट करतात. याचसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एमबीबीएस डॉ. आदितीज धमिजा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, "भुवया कोरण्यासाठी पार्लरमध्ये वापरण्यात येणाऱ्या धाग्यामुळे कित्येक गंभीर आजार होऊ शकतात. त्यांच्याकडे आलेल्या एका 28 वर्षीय तरुणीसोबत असेच काहीसे घडल्याचेही त्यांनी सांगितले. 28 वर्षीय तरुणी आयब्रोज करण्यासाठी गेली होती, पण लिवर निकामी करुन आली", असे डॉ. धमिजा यांनी सांगितलंय.

थकवा, मळमळ आणि पिवळे पडलेल्या डोळ्यांमुळे त्रस्त झालेली तरुणी डॉ. धमिजांकडे उपचार करण्यासाठी आली. डॉ. धमिजा यांनी पुढे असेही सांगितलं की, रक्त तपासणी केल्यानंतर तिचे लिवर धोकादायक स्थितीमध्ये असल्याचे आढळले. धक्कादायक बाब म्हणजे मद्यपान किंवा औषधांमुळे ही परिस्थिती ओढावली नव्हती तर ब्युटी पार्लरमधील धाग्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्या थ्रेडिंग मटेरिअलमुळे तिच्या त्वचेवर सूक्ष्म स्वरुपात जखमा (Micro Cuts) झाल्या होत्या, याद्वारे हेपेटायटिस बी आणि सीचे विषाणूंनी रक्तप्रवाहाद्वारे तिच्या शरीरात प्रवेश केला". 

(नक्की वाचा: केशर खाल्ल्याने नैराश्य दूर होते? सोशल मीडियावरील दाव्यांचा फॅक्ट चेक)

स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास थ्रेडिंग करणं घातक ठरू शकते?

डॉ. धमिजा यांनी दिलेल्या माहितीनुसार,

  • ब्युटी पार्लरमध्ये धाग्याचा पुन्हा-पुन्हा वापर केल्यास रक्ताच्या माध्यमातून धोकादायक विषाणू पसरू शकतात.   
  • त्वचेवरील सूक्ष्म स्वरुपाच्या जखमांमुळे हेपेटायटिस बी, सी किंवा एचआयव्ही यासारख्या गंभीर आजारांची लागण होऊ शकते. 

(नक्की वाचा: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही छोटी-छोटी पाने, स्पर्शही करणार नाही या 4 गंभीर समस्या)

गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी काय करावे? 

  • ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर आयब्रोजचा धागा नवीन आहे की नाही? याची खात्री करुन घ्यावी. 
  • आयब्रोज करण्यापूर्वी आणि केल्यानंतर संबंधित व्यक्तीने हात स्वच्छ धुतलेले असणे आवश्यक आहे. 
  • आयब्रोज किंवा अपरलिप्स करताना त्वचेवर जखमा होऊन रक्त आल्यास थ्रेडिंग करणं टाळावे. 
  • व्हॅक्स करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचंही निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. 
  • प्रशिक्षित आणि स्वच्छतेचे पालन होत असतील अशाच ब्युटी पार्लरमध्ये जावे.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)