जाहिरात

Fact Check News: मिठाचा हात लागल्यास केस पांढरे होतात? जाणून घ्या यामागील सत्य

Salt Water For Hair: मिठाच्या पाण्यामुळे केस पांढरे होतात का? असा प्रश्न अनेकांना पडतो. नेमके काय आहे यामागील सत्य, जाणून घेऊया...

Fact Check News: मिठाचा हात लागल्यास केस पांढरे होतात? जाणून घ्या यामागील सत्य
"Salt Water Side Effects For Hair: मिठामुळे केस पांढरे होतात का?"

Salt Water Side Effects For Hair: आपल्या शरीराशी संबंधित अशा कित्येक गोष्टी आहेत, ज्या आपण लहानपणापासून ऐकत आलोय. आई-आजी किंवा एखाद्या वयोवृद्ध माणसाने सांगितलेल्या गोष्टी काही लोक आजही फॉलो करतात. यातील काही गोष्टींना वैज्ञानिक आधार नसतो, पण गोष्टी खरंच फायद्याच्या असतात. केसांना मिठाचे पाणी किंवा मिठाचा हात लागल्यास केस पांढरे होतात, ही गोष्टही तुम्ही लहानपणी ऐकली असावी. खरंच असे होते का, यामागील सत्य जाणून घेऊया... 

केस पांढरे का होतात?

  • काळे केस पांढरे का होतात, हे सर्वप्रथम जाणून घेऊया.
  • केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. 
  • वाढते वय, शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता यामुळे केस पांढरे होऊ शकतात. 
  • आपल्या शरीरातील मेलेनोसाइट्स पेशी वयानुसार कमी होत जातात, ज्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या निर्माण होऊ लागते. 
  • अयोग्य जीवनशैली, जंक फुडचे अतिरिक्त सेवन, ताणतणाव, केमिकलयुक्त ट्रीटमेंट, आजारपण, आनुवंशिकता यासारख्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. 

Omega 3 For Hair And Skin: ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमुळे त्वचा आणि केसांवर काय परिणाम होतात?

(नक्की वाचा: Omega 3 For Hair And Skin: ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमुळे त्वचा आणि केसांवर काय परिणाम होतात?)

मिठामुळे केस पांढरे होतात का?

मिठामुळे केस पांढरे होतात, ही बाब आजवर सिद्ध झालेले नाही. त्वचारोगतज्ज्ञांची माहितीनुसार, मिठाचे पाणी किंवा मिठाचा केसांना हात लागल्यास केस पांढरे होत नाहीत. मिठामुळे केसांचे नुकसान होऊ शकते, पण पांढऱ्या केसांमागील कारण असू शकत नाही. खारट पाण्यामुळे केस कोरडे होऊ शकतात तसेच स्कॅल्पशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे आई-आजी केसांपासून मीठ दूर ठेवण्याचा सल्ला देत असतील.  

Hair Growth Tips: केसांना तेल लावून झोपल्यास काय होते? जाड-मजबूत केसांसाठी कोणते तेल बेस्ट आहे? वाचा उत्तर

(नक्की वाचा: Hair Growth Tips: केसांना तेल लावून झोपल्यास काय होते? जाड-मजबूत केसांसाठी कोणते तेल बेस्ट आहे? वाचा उत्तर)

केसांची काळजी कशी घ्यावी?

  • पांढऱ्या केसांची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी केसांची योग्य देखभाल करावी. 
  • प्रोटीनयुक्त डाएट फॉलो करावा. 
  • केस कोरडे होणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर कमी करावा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com