जाहिरात

Hair Growth Tips: केसांना तेल लावून झोपल्यास काय होते? जाड-मजबूत केसांसाठी कोणते तेल बेस्ट आहे? वाचा उत्तर

Hair Growth Tips: रात्री झोपताना केसांना तेल लावून झोपावे का, केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत काय आहे? केसांना रोज तेल लावावे का? जाणून घ्या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती...

Hair Growth Tips: केसांना तेल लावून झोपल्यास काय होते? जाड-मजबूत केसांसाठी कोणते तेल बेस्ट आहे? वाचा उत्तर
"Hair Care Tips: केसांना तेल लावून झोपावे का?"

Hair Growth Tips: जाड, मजबूत, घनदाट आणि लांबसडक केस मिळवण्यासाठी महिलावर्ग कित्येक महागडे उपाय करतात. पण केसांच्या देखभालीसाठी आई-आजीने सांगितलेला मोठा उपाय म्हणजे तेल लावणे. पण केसांना नियमित तेल लावावे का, केसांना तेल लावून झोपावे का, यामुळे केसांचे नुकसान होईल की केसांना फायदे मिळतील, यासह असंख्य प्रश्नांमुळे अनेकांचा गोंधळ उडतो. केसांच्या वाढीसाठी, जाड आणि मजबूत केसांसाठी कोणते तेल वापरावे तसेच केसांना तेल लावण्याची पद्धत जाणून घेऊया...

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत (Right Way Of Hair Oiling)

रात्री झोपताना केसांना तेल लावून झोपल्यास काय होईल? 

झोपण्यापूर्वी केसांना तेल लावून झोपणे फायदेशीर मानले जाते. कारण तेलाद्वारे स्कॅल्पला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे केस मुळासकट मजबूत, चमकदार आणि मऊ देखील होतात. याव्यतिरिक्त तेल लावून मसाज केल्यास स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल आणि केसांची वाढ होण्यासही मदत मिळेल. पण दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ न धुतल्यास केसांमध्ये धूळ-घाण जमा होईल. यामुळे केसगळती, कोंडा होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Latest and Breaking News on NDTV

केसांना रोज तेल लावावे की लावू नये? (Should You Apply Oil to Hair Daily or Not?)

रोज तेल लावल्यास केसांची वाढ पटापट होईल, असा काहींचा समज असतो. पण यामध्ये काहीही तथ्य नाहीय. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तेल लावावे. रोज तेल लावून घराबाहेर पडल्यास केसांमध्ये धूळ जमेल, यामुळे केसांचे नुकसान होईल. 

Hair Care Tips: रात्री झोपताना केस बांधावे की मोकळे सोडावे? एक सवय बदलू शकते तुमच्या केसांचे आरोग्य

(नक्की वाचा: Hair Care Tips: रात्री झोपताना केस बांधावे की मोकळे सोडावे? एक सवय बदलू शकते तुमच्या केसांचे आरोग्य)

Latest and Breaking News on NDTV

जाड केसांसाठी आणि केसांच्या वाढीसाठी कोणते तेल लावावे? (Which Oil Is Best for Hair Thickness and New Growth?)

  • नारळ तेल : केसांसाठी जुना आणि रामबाण उपाय, नारळाच्या तेलामुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होते. 
  • आवळा तेल : केस मजबूत, काळेभोर, घनदाट आणि मजबूत होतात.   
  • एरंडेल तेल : फॅटी अ‍ॅसिडमुळे केसांची चांगली वाढ होते आणि केस जाड होण्यासही मदत मिळू शकते.  
  • भृंगराज तेल: आयुर्वेदानुसार केसांच्या वाढीसाठी सर्वात उत्तम तेल मानले जाते.  

(नक्की वाचा: Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी सर्वात चांगले तेल कोणते?)

केसांना किती तास तेल लावून ठेवावे? (How Many Hours Should You Keep Oil in Hair?)

  • केसांमध्ये रात्रभर तेल लावून ठेवण्याऐवजी सहा ते आठ तासांसाठी केसांना तेल लावणे पुरेसे आहे. 
  • कमीत कमी दोन ते तीन तासही केसांना तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. 

केसांमध्ये रात्रभर तेल लावून ठेवणे योग्य आहे का?  (Does Leaving Oil Overnight Cause Hair Fall?)

तुम्ही वेळोवेळी केस स्वच्छ धुतले नाही तर तेल आणि घाणीमुळे स्कॅल्पवरील पोअर्स बंद होतील, यामुळे केसगळतीची समस्या निर्माण होऊ शकते. 
तेल लावून शॅम्पूने केस स्वच्छ धुतले तर केसगळतीची समस्या होणार नाही. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com