
Benefits Of Omega 3 For Hair And Skin: आपली त्वचा सुंदर, निरोगी आणि चमकदार असावी;अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी काही मंडळी महागडे उपाय करतात तर काही लोक नैसर्गिक-घरगुती उपचारांची मदत घेतात. पण सुंदर त्वचा मिळवण्यासाठी बाहेरील बाजूने उपचार करणं फायद्याचे ठरणार नाही. यासाठी शरीर आतील बाजूनंही निरोगी असणं आवश्यक आहे. निरोगी त्वचा आणि केसांसाठी शरीराला कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होणे गरजेचे असते. यापैकी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ओमेगा-3 फॅटी अॅसिड. ओमेगा-3 फॅटी अॅसिड त्वचा आणि केसांसाठी कसे उपयुक्त ठरू शकते, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया...
ओमेगा-3 फॅटी अॅसिडबाबत तज्ज्ञांचे काय म्हणणंय?
प्रसिद्ध डर्मेटॉलॉजिस्ट अंकुर सरीन यांनी यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा त्वचा आणि केसांवर थेट परिणाम कसा होतो, याबाबत माहिती सांगितलीय.
त्वचेसाठी ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे फायदे
1. त्वचा हायड्रेट राहते
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे कोरड्या त्वचेची समस्या कमी होते कारण त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
2. मुरुमांची समस्या कमी होते
ओमेगा-3मध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे पिंपल्स आणि त्वचेवर येणाऱ्या लाल रंगाच्या चट्ट्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
3. वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात
त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. कारण शरीरातील कोलेजनच्या उत्पादनावर परिणाम होत नाही.
4. त्वचा निरोगी राहते
त्वचा संसर्ग कमी होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Fruits Benefits: दोन फळं रोज खाल्लीच पाहिजे, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून होईल बचाव)
केसांच्या आरोग्यासाठी ओमेगा-3चे फायदे
1. स्कॅल्पला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो
स्कॅल्पची त्वचा कोरडी झाली असेल तर ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. कोंडा कमी होण्यास मदत मिळते.
2. केसगळती कमी होते
केस मुळासकट मजबूत होतात आणि केसगळतीचे प्रमाण कमी होते.
3. केस चमकदार होतात
ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे हेअर फॉलिकल्सना आतील बाजूने पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो, यामुळे केस मजबूत आणि चमकदार होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Best Time To Eat Fruits: फळं खाण्याची सर्वात चांगली वेळ कोणती? न्युट्रिशनिस्टने सांगितली महत्त्वाची माहिती)
केसांना ओमेगा 3 फॅटी अॅसिड कसे मिळेल?
- तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे सॅल्मन मासा, ट्युना मासा, सार्डिन मासा, अळशीच्या बिया, अक्रोड, चिया सीड्स हे आहेत.
- डाएटच्या माध्यमातून ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा शरीराला पुरवठा होत नसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फिश ऑइल यासारख्या औषधांचा आधार घेऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world