जाहिरात

Fast Hair Growth Oil: केसांची होईल भराभर वाढ, घरच्या घरी तयार करा हे तेल; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती

Fast Hair Growth Oil: काळेभोर, लांबसडक आणि घनदाट केस हवे आहेत का? तर नैसर्गिक सामग्रींचा वापर करुन घरच्या घरी तेल तयार करू शकता. 15 दिवसांत केसांमध्ये सकारात्मक बदल दिसतील.

Fast Hair Growth Oil: केसांची होईल भराभर वाढ, घरच्या घरी तयार करा हे तेल; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती
"Fast Hair Growth Oil: घनदाट आणि केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय"
Canva

Fast Hair Growth Oil: केसगळतीच्या समस्येमुळे महिलावर्गच नव्हे तर पुरुष देखील त्रासलेले आहेत. प्रदूषण, तणाव, असंतुलित आहार आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सच्या वापरामुळे केसांवर दुष्परिणाम होतात. परिणामी केसांचे गळती, केसांचे तुटणे, केस पातळ होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय करणं फायदेशीर ठरू शकते. जास्वंदाचे फुल आणि मेथीच्या बिया याद्वारे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल, यामुळे केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळतील. 

जास्वंदाच्या फुलाचे फायदे (Benefits of Hibiscus for Hair)

  • जास्वंदाचे फुल आणि पानांमध्ये व्हिटॅमिन सी, अमिनो अ‍ॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स या गुणधर्मांचा साठा आहे, यामुळे केस आतील बाजूने मजबूत आणि चमकदार होतील. 
  • जास्वंदातील अमिनो अ‍ॅसिडमुळे केसांचे तुटणे कमी होते आणि मूळ मजबूत होतील. 
  • केस मऊ होण्यास मदत मिळेल. 
  • स्कॅल्पच्या भागातील रक्तप्रवाह सुधारेल आणि नवीन केस येण्यास मदत मिळेल.    
  • अँटी-फंगल गुणधर्मामुळे डोक्याला येणारी खाज आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

मेथीच्या बियांचे फायदे (Benefits of Fenugreek for Hair)

  • प्रोटीन, लोह, लेसिथिन आणि निकोटिनिक अ‍ॅसिडचे चांगले स्त्रोत म्हणजे मेथीच्या बिया. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. 
  • मेथीच्या बियांमधील पोषणतत्त्वांमुळे फॉलिकल्स मजबूत होतील, केसगळतीही थांबेल.  
  • लेसिथिनमुळे स्कॅल्पच्या भागाला पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. केसांचे झालेले नुकसान भरुन निघेल आणि केस घनदाट होण्यासही मदत मिळेत.  
  • मेथीच्या बियांमुळे केस मऊ आणि चमकदारही होतील.  

जास्वंदाचे फुल आणि मेथीच्या बियांपासून तेल तयार करण्याची विधी
सामग्री : 

  • एक कप नारळाचे तेल 
  • पाच ते सहा जास्वंदाचे फुल आणि काही पाने
  • दोन मोठे चमचा मेथीच्या बिया 

Hair Growth Tips: 45 दिवस हा मास्क लावून तरुणाने मुलींप्रमाणे लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस मिळवले VIDEO VIRAL

(नक्की वाचा: Hair Growth Tips: 45 दिवस हा मास्क लावून तरुणाने मुलींप्रमाणे लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस मिळवले VIDEO VIRAL)

तेल तयार करण्याची प्रक्रिया

  • एका पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करत ठेवा. 
  • तेल कोमट झाल्यास त्यामध्ये जास्वंदाचे फुल-पाने आणि मेथीच्या बिया मिक्स करा.  
  • तेलाचा रंग लाल होईपर्यंत सर्व सामग्री व्यवस्थित शिजू द्यावी. 
  • गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्यावे.   
  • तेल थंड झाल्यानंतर गाळून काचेच्या बॉटलमध्ये भरा.  

White Hair Remedies: पांढरे केस मुळासकट काळेभोर होतील, फॉलो करा या 5 टिप्स

(नक्की वाचा: White Hair Remedies: पांढरे केस मुळासकट काळेभोर होतील, फॉलो करा या 5 टिप्स)

तेलाचा वापर कसा वापर?

  • आठवड्यातून दोनदा या तेलाचा वापर करावा, हलक्या हाताने मसाज करावा. 
  • तेल तासभर केसांना लावून त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.   
  • नियमित हा उपाय केल्यास केस घनदाट, मऊ आणि मजबूत होतील.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com