
Ayurvedic Remedy For UTI: लघवी करताना होणारी जळजळ, वारंवार लघवी होणे, अंगावरुन पांढरे पाणी जाणे यासारख्या समस्यांमुळे कित्येक महिला त्रासलेल्या आहेत. या समस्येमागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. उदाहरणार्थ पाणी कमी पिणे, शरीरामध्ये उष्णता वाढणे, संसर्ग किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी. तुम्ही देखील या समस्यांचा सामना करताय का? तर या लेखातील माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट श्वेता शाहने सांगितलेले उपाय फॉलो केल्यास केवळ तीन महिन्यांमध्ये तुम्हाला आराम मिळू शकतो. जाणून घ्या सविस्तर माहिती...
पहिला उपाय
सामग्री
- 2 ग्रॅम उडदाच्या डाळीची पावडर
- 2 ग्रॅम घोडवेलची पावडर
- 2 ग्रॅम जेष्ठमध पावडर
- 2 ग्रॅम शुद्ध मध
- 2 ग्रॅम खडीसारखेची पावडर
वरील सर्व सामग्री एकत्रित करुन दिवसभरात एकदा पाण्यासह प्या. तीन दिवस हा उपाय करावा. आयुर्वेदानुसार या पाण्यामुळे शरीराला थंडावा मिळेल आणि मूत्रमार्गाशी संबंधित संसर्ग तसेच समस्याही कमी होतील.
दुसरा उपाय
श्वेता शाह यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, लघवी करताना वारंवार जळजळ होत असेल किंवा वारंवार लघवी होत असेल तर डाळिंबाच्या सालीचे पेय तयार करुन प्यावे.
चार ते पाच डाळिंबाच्या साली ग्लासभर पाण्यात उकळा.
- पाणी आटल्यानंतर ते गाळावे.
- न्युट्रिशनिस्ट शाहने दिवसभरात दोनदा हे पाणी पिण्याचा सल्ला दिलाय.
- यामुळे शरीर थंड राहील, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील आणि लघवीशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल.
या गोष्टींचीही काळजी घ्यावी
- दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- तेलकट-तिखट पदार्थांचे सेवन करणं टाळा.
- नारळाचे पाणी, ताक आणि लिंबू पाणी प्यावे.
- लघवी थांबवून ठेवू नये, असे केल्यास संसर्ग वाढू शकतो.
(नक्की वाचा: Remedy for Burning Urine: लघवी करताना जळजळ होतेय? हा रामबाण उपाय केल्यास मिळेल सुटका)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world