जाहिरात

Fennel Seeds Benefits : जेवणानंतर खाणाऱ्या इवल्याशा पदार्थाचे प्रभावी परिणाम, नसेल खात तर आजपासून करा सुरू

पोटभर जेवण झालं की पचनासाठी आवर्जुन इवलासा पदार्थ खाल्ला जातो. इवल्याशा बियांचा हा पदार्थ टाइमपास वाटत असला तरी त्याचे परिणाम जबरदस्त आहेत.

Fennel Seeds Benefits : जेवणानंतर खाणाऱ्या इवल्याशा पदार्थाचे प्रभावी परिणाम, नसेल खात तर आजपासून करा सुरू

Fennel Seeds Benefits: पोटभर जेवण झालं की पचनासाठी आवर्जुन इवलासा पदार्थ खाल्ला जातो. इवल्याशा बियांचा हा पदार्थ टाइमपास वाटत असला तरी त्याचे परिणाम जबरदस्त आहेत. अनेक घरांमध्ये जेवणानंतर सुपारी खाण्याची पद्धत आहेत. तर काहींच्या घरात बडीशेपने भरलेली बरणीच असते. ही बडीशेप मोठी परिणामकारक आहे. 

आयुर्वेदात, बडीशेपला औषधी गुणधर्मांचा खजिना मानलं जातं. बडीशेपमुळे केवळ पचन सुधारत नाही तर रक्तदाब, मधुमेह, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यादेखील कमी होतात. बडीशेपमध्ये असलेले खनिजे आणि जीवनसत्त्वे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. दररोज बडीशेपचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी कसे आश्चर्यकारक ठरू शकते ते जाणून घ्या.

आयुर्वेदात बडीशेपचा उपयोग विविध आजारांवर उपचारासाठी केला जातो. हे एक औषधी रोप आहे. याचा उपयोग मसाल्यांमध्ये केला जातो. बडीशेप केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. याच्या बियांमध्ये औषधीय गुण शरीराचं आरोग्य राखणे आणि आजारांमध्ये दिलासा देण्यास मदत करते. 

बडीशेपचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉपर, पोटॅशियम, झिंक, मँगनीज, विटॅमिन सी, आर्यन, सेलेनियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषण तत्व आढळतात. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. बडीशेपमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते. त्यामुळे बडीशेपच्या नियमित सेवनाने रक्तदाबाच्या रुग्णांना दिलासा मिळतो. 

High Uric Acid: हाय युरिक अ‍ॅसिड समस्येमुळे त्रस्त आहात? हे हिरवेगार पान ठरेल वरदान, उपचाराची योग्य पद्धत वाचा

नक्की वाचा - High Uric Acid: हाय युरिक अ‍ॅसिड समस्येमुळे त्रस्त आहात? हे हिरवेगार पान ठरेल वरदान, उपचाराची योग्य पद्धत वाचा

बद्धकोष्ठता - 

१-२ ग्रॅम बडीशेपची पावडर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेवर फायदा होतो. जेवणानंतर मुलांना बडीशेपचा काढा (५-१० मिली) दिल्यानेही बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. 

मधुमेह - 

बडीशेपच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यास मदत करते. बडीशेपमधील घटक इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचं पाणी पिणे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

त्वचा - 

बडीशेपमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती रोखण्यास मदत होते. बडीशेपाच्या नियमित सेवनाने त्वचेचा रंग सुधारतो आणि केस मजबूत होतात.

पचन - 

बडीशेपमध्ये आढळणाऱ्या आवश्यक तेलांमध्ये अँटी-स्पास्मोडिक गुणधर्म असतात. जे पोटाच्या स्नायूंना आराम देतात. ते गॅस, पोटफुगी आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम देतात. या कारणास्तव, बडीशेप घातलेला चहा पचन सुधारण्यासाठी एक नैसर्गिक उपाय मानला जातो.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com