Weight Loss Tips: 45 दिवसांत 7Kg वजन केलं कमी! ना डाएट, ना उपवास फक्त 'या' 5 सवयींमुळे मिळवलं स्लिम शरीर

Weight Loss Tips: फिटनेस इन्फ्लुएन्सर प्रीती शर्माने कोणत्याही फॅन्सी डाएटशिवाय अवघ्या 45 दिवसांत 7 किलो वजन कमी करून दाखवले. पोळी-भात खाऊन आणि रोजच्या साध्या सवयी बदलून तिने हे वेट लॉस कसे साध्य केले, याचा संपूर्ण डाएट आणि वर्कआउट प्लॅन नक्की वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Weight Loss Tips: तरुणीने 45 दिवसांत 7 किलोग्रॅम वजन केले कमी"
Preeti Sharma Instagram

Weight Loss Tips: वजन कमी करण्याचा (वेट लॉस) विचार येताच बहुतेक लोक सर्वात आधी एखाद्या नवीन डाएटचा, महागड्या सप्लीमेंट्सचा किंवा फॅट बर्नरचा शोध सुरू करतात. अनेक लोक जेवणंच जवळजवळ सोडून देतात, तर काही जण तास-न्-तास जिममध्ये घाम गाळू लागतात. पण एका फिटनेस इन्फ्लुएन्सरचा दावा आहे की त्यांचा अनुभव यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. तिचं म्हणणंय की वजन कमी करण्याचे सर्वात मोठे रहस्य कोणत्याही जादुई डाएटमध्ये नसून रोजच्या अशा सवयींमध्ये दडलेले आहे, ज्याकडे लोकांचे सहसा लक्षच जात नाही. तिने केवळ 45 दिवसांत 7 किलो वजन कमी केले आणि यासाठी ना उपाशी राहावे लागले ना कोणत्याही फॅन्सी प्लॅनचा आधार घ्यावा लागला. तिची ही कहाणी आता सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सर्वात आधी ताटातून कमी केल्या 'या' गोष्टी| Weight Loss Tips In Marathi

फिटनेस इन्फ्लुएन्सर प्रीती शर्माच्या मते, वजन कमी करण्याची सुरुवात तिने नवीन गोष्टी खाण्यापासून नाही, तर काही गोष्टी सोडण्यापासून केली... 

  • कोल्ड ड्रिंक्स
  • पॅकेज्ड ज्युस (पाकीटबंद रस)
  • चहा-कॉफीमधील साखर
  • बिस्किटे
  • बेकरीचे पदार्थ
  • व्हाइट ब्रेड
  • तळलेले स्नॅक्स आणि रात्री उशीरा मॅगी खाणे पूर्णपणे बंद केले
  • भूक नसताना केवळ इच्छेपोटी आणि वारंवार फुड डिलिव्हरी अ‍ॅप्सवरून जेवण ऑर्डर करणे देखील सोडून दिले.

(नक्की वाचा: Frequent Urination Symptoms: रात्री वारंवार लघवी होते? असू शकतो हा भयंकर कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितले 3 मोठी लक्षणं)

डाएटिंग नव्हे तर प्रोटीनवर फोकस केले

कोणतंही डाएट फॉलो केले नाही. प्रयत्न फक्त इतकाच होता की प्रत्येक वेळच्या जेवणात प्रोटीनचा (प्रथिने) नक्की समावेश असेल, असे प्रीतीने सांगितले. सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, ओट्स, पीनट बटर, फळे, पनीर भुर्जी किंवा मोड आलेली कडधान्ये (स्प्राउट्स) यासारख्या गोष्टींचा समावेश होता. दिवसाची सुरुवात प्रोटीनने केल्यास प्रदीर्घ काळ पोट भरल्यासारखे वाटते, असे तिने म्हणणंय. 

Advertisement

पोळी आणि भातही खाल्ला

विशेष म्हणजे तिने वेटलॉस जर्नीमध्ये पोळी आणि भात आहारातून पूर्णपणे वर्ज्य केले नाही. दुपारच्या जेवणात दोन पोळ्या किंवा थोड्या प्रमाणात भातासोबत डाळ, पनीर किंवा ग्रिल्ड चिकन खाल्ले. यासह घरात तयार केलेली भाजी आणि एक मोठे बाऊल सॅलेडचाही समावेश केला. प्रीतीने रात्रीचे जेवण हलके स्वरुपातील करण्यावर भर दिला. यामध्ये पनीर, टोफू, ग्रिल्ड चिकन, ऑम्लेट, डाळ आणि भाज्यांचा समावेश होता. त्यांनी रात्रीच्या वेळी कार्बोहायड्रेट्सयुक्त (कार्ब्स) पदार्थ खाणे टाळले आणि रात्री 9 वाजेनंतर काहीही न खाण्याचा नियम बनवला.

(नक्की वाचा: Rusted Knife Health Risks: सावधान! गंजलेल्या चाकूने फळं-भाज्या कापताय? FSSAIने दिला कडक इशारा)

फक्त कार्डिओ नाही तर स्ट्रेंथ ट्रेनिंगवरही दिला भर

वर्कआउटमध्ये तिने आठवड्यातून 4 ते 5 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग केले. स्क्वॉट्स, Lunges, पुशअप्स, रोइंग आणि शोल्डर प्रेस यासारख्या व्यायाम प्रकाराचा सराव केला. प्रत्येक सेशननंतर 15 ते 20 मिनिटे कार्डिओ देखील केला. याशिवाय रोज 8 ते 10 हजार पावले चालण्याचे टार्गेट ठेवले.

प्रीतीच्या मते वजन कमी करण्यात केवळ डाएट आणि वर्कआउटनेच नाही तर काही छोट्या सवयींनीही मोठी भूमिका बजावली. रोज जवळपास 3 लिटर पाणी पिणे, सात ते आठ तासांची झोप घेणे, अतिरिक्त खाणे टाळले आणि दर आठवड्याला स्वतःच्या प्रोग्रेसचा ट्रॅक ठेवला. वजन कमी करणे हा कोणत्याही शॉर्टकटचा खेळ नसून त्यामध्ये सातत्य टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे प्रीतीने सांगितले.  

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)