
15 Minutes Green Chilli Pickle Recipe: भारतातील जेवणाची थाळी लोणच्याविना अपूर्ण आहे, असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. रोजच्या जेवणासह ते सणसमारंभ, एखाद्या कार्यक्रमाच्या जेवणातही लोणच्याचा समावेश असतोच. लोणच्यामुळे जेवण अधिक चविष्ट लागते. पण लोणचे तयार करण्याची प्रक्रिया बरीच मोठी आहे. कारण लोणचे तयार केल्यानंतर ते उन्हात ठेवणे, मसाला तयार करणे यासह कित्येक गोष्टींसाठी मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला देखील लोणचे खाणे पसंत असेल तर हिरव्या मिरचीच्या लोणच्याची इन्स्टंट रेसिपी जाणून घेऊया. महत्त्वाचे म्हणजे हे लोणचे अगदी 15 मिनिटांमध्ये तयार होईल.
हिरव्या मिरचीचे लोणचे | Green Chilli Pickle Recipe
सामग्री
- हिरवी मिरची (जाडसर, तिखट कमी असणारी) – 250 ग्रॅम
- मोहरीचे तेल - अर्धा कप
- लिंबाचा रस - 4-5 मोठे चमचे (किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार)
- पिवळ्या मोहरी - दोन मोठे चमचे
- बडीशेप - एक मोठा चमचा
- मेथीचे दाणे - एक मोठा चमचा
- कलौंजी – 1 छोटा चमचा
- हळद- अर्धा छोटा चमचा
- चवीनुसार मीठ
(नक्की वाचा: Fennel Seeds Water: दात न घासता बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे)
लोणचे तयार करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम हिरव्या मिरच्या पाण्याने धुतल्यानंतर त्या कापडाने पुसून घ्या.
- मिरचीचे देठ काढून त्या चिरुन घ्या.
- एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करावा.
- दुसऱ्या पॅनमध्ये मोहरी, बडीशेप आणि मेथीचे दाणे भाजून घ्या. सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्या.
- एका भांड्यामध्ये चिरलेली मिरची घ्या आणि जाडसर वाटलेली पेस्ट, कलौंजी, हळद आणि मीठ मिक्स करावे.
- आता वरुन मोहरीचे तेल मिक्स करा आणि सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करुन घ्यावी.
- हवे असल्यास लिंबाचा रसही मिक्स करू शकता.
- एक ते दोन तास लोणचे तसेच ठेवावे म्हणजे सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव होईल.
- लोणचे तयार झाल्यानंतर पराठा, पोळी किंवा वरण-भातासोबत खाऊ शकता.
(नक्की वाचा: Banana Side Effects: रात्री झोपण्यापूर्वी केळ खाऊ शकतो का?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world