
Harvard University News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठावर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. हार्वर्ड विद्यापीठ आता परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाही. गृह सुरक्षा सचिवांनी एक पत्र लिहून, चौकशी पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू राहील असं म्हटलं आहे. ट्रम्प सरकारचा आरोप आहे की हार्वर्डमध्ये ज्यू विरोधी भावनांना प्रोत्साहन दिले जात आहे आणि ते चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या सहकार्याने काम करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, जर हार्वर्डला येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम प्रमाणपत्र परत मिळवण्याची संधी हवी असेल तर त्यांनी 72 तासांच्या आत आवश्यक माहिती सादर करावी. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, दरवर्षी 500-800 भारतीय विद्यार्थी हार्वर्डमध्ये शिक्षण घेतात. सध्या, हार्वर्ड विद्यापीठात भारतातील 788 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत.
( नवी वाचा : Pakistan News : तुकडे-तुकडे पाकिस्तान! स्वतंत्र बलुचिस्ताननंतर आता सिंधुदेशाची मागणीही तीव्र, वाचा सविस्तर )
हार्वर्ड जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आठ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि 200 हून अधिक सध्याचे अब्जाधीश तसेच आजवरचे 188 अब्जाधीश माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ज्यांची एकूण संपत्ती अंदाजे 5.43 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.
(नक्की वाचा- Plane crash: अमेरिकेत विमान कोसळलं, 15 घरांना लागली आग, अनेक जण दगावल्याची भीती)
ट्रम्प यांचे प्रशासन फक्त हार्वर्डच नाही तर अनेक अमेरिकन विद्यापीठांवर कारवाई करत आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की ही विद्यापीठे ज्यू-विरोधी चळवळीचे केंद्र बनली आहेत आणि हमासला पाठिंबा देत आहेत. प्रशासन, याला राजकीय चळवळ म्हणत, विद्यापीठात कोण प्रवेश घेईल, कोण शिकवेल इत्यादींवर नियंत्रण ठेवू इच्छित आहे, असे दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world