जाहिरात

Good Friday 2025: गुड फ्रायडे म्हणजे नेमके काय? या दिवसाचे काय आहे महत्त्व

Good Friday 2025: 'गुड फ्रायडे'ला ब्लॅक फ्रायडे असेही म्हटलं जातं. 'गुड फ्रायडे' शी संबंधित माहिती जाणून घेऊया...

Good Friday 2025: गुड फ्रायडे म्हणजे नेमके काय? या दिवसाचे काय आहे महत्त्व
"Good Friday 2025: गुड फ्रायडे म्हणजे नेमके काय?"

Good Friday 2025: 'गुड फ्रायडे' हा ख्रिस्ती धर्मासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. ईस्टर संडेच्या एक दिवस आधी हा दिवस साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्माचे लोक हा दिवस शोक दिवस मानतात. गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती धर्माचे अनुयायी चर्चमध्ये जातात आणि मानवतेसाठी येशू ख्रिस्ताने दिलेल्या बलिदानाचे स्मरण करतात. याव्यतिरिक्त गुड फ्रायडेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'हॅपी गुड फ्रायडे' का म्हटले जात नाही? (Why Don't We Say 'Happy Good Friday')

- ख्रिस्ती धर्माचे लोक या दिवशी शोक व्यक्त करतात आणि उपवास देखील करतात.
- गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती समूह मांसाहार करत नाहीत. या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि येशू ख्रिस्तांच्या शिकवणींना-आठवणींना उजाळा देतात. 
- गुड फ्रायडेच्या दिवशी काही ठिकाणी येशू ख्रिस्तांचे बलिदान आणि त्यांचे शेवटचे शब्द तसेच त्यांच्याशी संबंधित विशेष घटनांचे देखावेही तयार केले जातात. 

Ambedkar Jayanti 2025 Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार

(नक्की वाचा: Ambedkar Jayanti 2025 Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार)

- गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांना चाबकाने मारल्यानंतर वधस्तंभावर चढवण्यात आले होते. गोलमोथा नावाच्या ठिकाणी ही घटना घडली होती.   
- बायबलनुसार, ज्या दिवशी येशू ख्रिस्त यांना वधस्तंभावर चढवण्यात आले होते, तो दिवस शुक्रवार होता. म्हणूनच हा दिवस 'गुड फ्रायडे' या नावाने ओळखला जातो. 
- होली फ्रायडे या नावाने देखील हा दिवस ओळखला जातो. कारण हा दिवस प्रेम, बलिदान आणि चांगुलपणाचा मानला जातो. 
- काही लोक गुड फ्रायडेमधील गुड या शब्दाचा अर्थ गॉड आहे, असे मानतात.  
- म्हणून या दिवशी कोणालाही हॅपी गुड फ्रायडे असे म्हटलं जात नाही. कारण ख्रिस्ती धर्मासाठी हा शोक दिवस मानला जातो. 
- यंदा गुड फ्रायडे 18 एप्रिलला आहे.  

(नक्की वाचा: Parenting Tips: रामायणातील या 5 गोष्टी तुमच्या मुलांना शिकवा, जीवनामध्ये होईल मोठा फायदा) 

गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो? (How To Celebrate Good Friday)

  • ख्रिस्ती धर्माला मानणारे लोक या दिवशी घंटानाद करत नाहीत. 
  • चर्चमध्ये या दिवशी शांततेत प्रार्थना केली जाते. 
  • प्रभू येशूकडे लोक त्यांनी केलेल्या गुन्ह्याची माफी मागतात. 
  • गुड फ्रायडेच्या दिवशी घरातील सजावटीच्या वस्तू झाकून ठेवल्या जातात. 
  • गुड फ्रायडेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करुन शोक व्यक्त केला जातो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com