जाहिरात

ना कोणती ऑफर ना कोणती सवलत! तरीही iPhone 16 आणि Samsung S24 Ultra ची किंमत 8 ते 12 हजारांनी कमी होणार ?

iPhone 16 and Samsung S24 Mega Discount: या निर्णयामुळे स्मार्टफोन उद्योगाला मोठी चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ना कोणती ऑफर ना कोणती सवलत! तरीही iPhone 16 आणि Samsung S24 Ultra ची किंमत 8 ते 12 हजारांनी कमी होणार ?
मुंबई:

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीच्या सध्याच्या रचनेत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात त्यांनी हे संकेत दिले असून, दिवाळीपूर्वी तुम्हाला एक भेट मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर सध्या ज्या वस्तू आणि सेवांवर 18 टक्के जीएसटी लागतो त्या 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 18 टक्के जीएसटी ज्या वस्तूंवर लागतो त्या वस्तूंमध्ये मोबाईल फोनचाही समावेश आहे. जीएसटी स्लॅब बदल झाल्यास अनेक महागडे, आकर्षक फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा:  भारतात तयार केलेले iPhone अमेरिकेत विकले तर याद राखा! Apple ला 25 टक्के टॅरीफची धमकी

जर केंद्र सरकारने मोबाईल फोनवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 18% वरून कमी करून 5% केला, तर याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. विशेषतः प्रीमियम स्मार्टफोनच्या किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. या कपातीमुळे आयफोन 16 आणि सॅमसंग एस 24 अल्ट्रा सारख्या लोकप्रिय हँडसेटची किंमत मुंबईत हजारो रुपयांनी कमी होऊ शकते.

 iPhone 16 किती स्वस्त होईल?

सध्या मोबाईल फोनवर 18% जीएसटी लागतो, ज्यामुळे उत्पादनाच्या मूळ किमतीवर मोठा परिणाम होतो. जर जीएसटी 5% पर्यंत कमी झाला, तर किंमतीच्या गणितात मोठा बदल होईल. उपलब्ध माहितीनुसार, मुंबईमध्ये आयफोन 16 च्या 128GB मॉडेलची सध्याची किंमत सुमारे ₹79,900 आहे. जर जीएसटी 5% झाला, तर या फोनची किंमत सुमारे ₹71,097 पर्यंत खाली येऊ शकते, ज्यामुळे ग्राहकांना सुमारे ₹8,800 पेक्षा जास्त बचत होईल.

Samsung S24 Ultra किती स्वस्त होईल?

त्याचप्रमाणे, सॅमसंगच्या प्रीमियम मॉडेल सॅमसंग एस 24 अल्ट्राच्या 256GB मॉडेलची सध्याची किंमत मुंबईत सुमारे ₹1,09,999 आहे. जीएसटी कपातीनंतर या फोनची किंमत ₹97,880 पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ग्राहकांना सुमारे ₹12,100 हून अधिक बचत करता येईल.

नक्की वाचा: Google Glance ने लाँच केले खरेदीसाठी नवे अ‍ॅप, फोटो अपलोड करुन पाहता येणार तुमच्यासाठी कपडे

जीएसटी कपात झाल्यास विक्री वाढण्याचा अंदाज

अशा प्रकारची जीएसटी कपात झाल्यास स्मार्टफोन उद्योगाला मोठी चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कमी किमतीमुळे अनेक ग्राहक प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्यास प्राधान्य देतील. सध्या स्मार्टफोनची वाढती गरज पाहता, सरकारने हा निर्णय घेतल्यास ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि बाजारातील मागणी वाढण्यास मदत होईल. तसेच, यामुळे देशांतर्गत उत्पादनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. या कपातीमुळे कंपन्यांनाही उत्पादन खर्च आणि वितरण व्यवस्थापनात काही प्रमाणात सुलभता येईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com