
Guru Purnima 2025 Remedies: हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी अतिशय शुभ मानली जाते. ही तिथी गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2025) म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, असे म्हणतात. म्हणूनच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास समाजामध्ये मानसन्मान वाढेल आणि कामामध्ये प्रगती देखील होईल, असे म्हणतात.
(नक्की वाचा: Guru Purnima 2025 Date And Time: गुरुपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि महत्त्व)
गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे? (Guru Purnima 2025 Upay)
- गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे स्नान करुन घरातील देवांची पूजा करावी.
- देवांची पूजा केल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी.
- पूजेनंतर सर्वांना प्रसादाचेही वाटप करावे.
- हा उपाय केल्यास नोकरी-व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील.
- गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरज असणाऱ्या लोकांना पिवळ्या रंगाचे धान्य, मिठाई किंवा पिवळ्या वस्त्र दान केल्यास जीवनामध्ये आर्थिक लाभ मिळतो; असे मानले जाते.
- गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये गुरु यंत्राची स्थापना करावी, यामुळे वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.
- कुंडलीतील गुरु कमकुवत असेल तर हळद, पिवळ्या रंगाची डाळ, बेसन लाडू, केळी, चण्याची डाळ, केशर, पितळेचे भांडे यासारख्या गोष्टी दान करू शकता.
- गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्यास कुंडलीतील ग्रहाची स्थिती मजबूत होण्यास मदत मिळते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world