जाहिरात

Guru Purnima 2025 Date And Time: गुरुपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि महत्त्व

Guru Purnima 2025 Date And Time: गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे, पूजा विधी आणि याचे महत्त्व जाणून घेऊया...

Guru Purnima 2025 Date And Time: गुरुपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि महत्त्व
Guru Purnima 2025 Date And Time : यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे?

Guru Purnima 2025 Date And Time: हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीचे विशेष महत्त्व आहे. पण आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. ही तिथी धार्मिकदृष्ट्या अतिशय शुभ मानली जाते. आषाढ पौर्णिमा (Aashadh Purnima 2025) गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2025 Date) या नावानेही ओळखली जाते. हा दिवस गुरू आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते. शिष्य आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. यंदा कोणत्या दिवशी गुरुपौर्णिमा कधी साजरी करण्यात येणार आहे, गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी आणि या दिवसाचे महत्त्व काय असते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

गुरुपौर्णिमा 2025 कधी आहे? (When is Guru Purnima 2025)

गुरुपौर्णिमेच्या (Guru Purnima 2025 Date) तिथीस 10 जुलैला गुरुवारी 1.36 (AM) वाजता शुभारंभ होणार असून 11 जुलैला रात्री 2.06 (AM) वाजता तिथी समाप्त होईल. उदयातिथीनुसार यंदा 10 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल. 

Happy Guru Purnima 2025 Wishes: गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप! गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंना शुभेच्छा पाठवून व्यक्त करा कृतज्ञता

(नक्की वाचा: Happy Guru Purnima 2025 Wishes: गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप! गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंना शुभेच्छा पाठवून व्यक्त करा कृतज्ञता)

गुरुपौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त (Guru Purnima 2025 Shubh Muhurat) 

  • ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.10 वाजेपासून ते पहाटे 4.50 वाजेपर्यंत असेल
  • अभिजीत मुहूर्त सकाळी 11:59 वाजेपासून से 12:54 वाजेपर्यंत असेल 
  • विजय मुहूर्त दुपारी 12:45 वाजेपासून ते 03:40 वाजेपर्यंत असेल 
  • गोधूलि मुहूर्त संध्याकाळी 07:21 वाजेपासून ते 07:41 वाजेपर्यंत असेल 

Guru Purnima 2025 Date: गुरुपौर्णिमा कधी आहे, 10 की 11 जुलै? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि  उपाय

(नक्की वाचा: Guru Purnima 2025 Date: गुरुपौर्णिमा कधी आहे, 10 की 11 जुलै? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि उपाय)

गुरुपौर्णिमा पूजा विधी (Guru Purnima 2025 Puja Vidhi)

  • पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करुन आपल्या गुरूचा फोटो किंवा प्रतिमा चौरंगावर स्थापित करा. 
  • पूजेसाठी फुले, धूप, तुपाचा दिवा, नैवेद्य, अगरबत्ती, हळदकुंकू, गंगाजल अशा सामग्री आणावी.  
  • गुरुच्या प्रतिमेची पूजा करावी. 
  • गुरुमंत्रांचा जप करावा.
  • सर्वात शेवटी आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.

Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय! समाजात मानसन्मान वाढेल आणि कामात होईल प्रगती

(नक्की वाचा: Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय! समाजात मानसन्मान वाढेल आणि कामात होईल प्रगती)

गुरुपौर्णिमेचे महत्त्व (Guru Purnima Significance)

- गुरुपौर्णिमेची पूजा केल्यास जीवनामध्ये सुख-शांती-समृद्धी येते, असे म्हणतात. 
- ज्ञान-बुद्धीचा विकास होतो, असेही म्हणतात.  
- गुरूची पूजा केल्यास आध्यात्मिक विकास होण्यास मदत मिळते, अशी मान्यता आहे.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com