जाहिरात
Story ProgressBack

Happy Gudi Padwa: नातेवाईक-मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याचे हे शुभेच्छा संदेश पाठवून साजरा करा सण

Happy Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यानिमित्त आपले नातेवाईक-मित्रमैत्रिणींना मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश पाठवून सण साजरा करा.

Read Time: 3 min
Happy Gudi Padwa: नातेवाईक-मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याचे हे शुभेच्छा संदेश पाठवून साजरा करा सण
Happy Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa 2024: महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे 'गुढीपाडवा' (Gudi Padwa). हिंदू पंचांगनुसार 'गुढीपाडवा' (Gudi Padwa 2024 Celebration) या सणापासून मराठी नूतन वर्षाचे आगमन होते. या दिवशी गुढी उभारून नैवेद्य दाखवून नवीन वर्षाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत केले जाते. 

मित्र परिवार, नातेवाईक एकमेकांची भेट घेऊन हा सण दरवर्षी धुमधडाक्यामध्ये साजरा करतात. पण आताच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मित्र-नातेवाईकांची भेट घेणे अनेकदा शक्य होत नाही. पण आपण मोबाइल मेसेजद्वारे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा (Gudi Padwa 2024 Wishes In Marathi) पाठवूनही जवळच्या नातेवाईक-मित्रांसोबत हा सण उत्साहात साजरा करू शकतात.  

1. गत वर्षांच्या आठवणींना करून अलविदा
नवीन वर्षांचे करू स्वागत 
नवीन आठवणींची करूया साठवण
एकत्रित जल्लोषामध्ये साजरा करू गुढीपाडव्याचा सण
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

2. तुमच्या जीवनात प्रत्येक क्षणी येवो आनंदी 
दिवे-पणत्या लावून उभारूया गुढी  
नवीन वर्षामध्ये तुमचे आयुष्य होवो प्रकाशमान 
सुख-समृद्धीने होवो भरभराट 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 3. प्रत्येक नवी पहाटे तुमच्या जीवनात घेऊन येवो सुख-समृद्धी
दुपार घेऊन येवो विश्वासाचा झरा
सांयकाळ घेऊन येवो नवीन आशा
आणि नववर्षातील प्रत्येक दिवसाचा शेवट ठरो समाधानी  
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

4. आले रे आले मराठी नूतन वर्ष आले
आनंदाचे क्षण सोबत घेऊन आले
हसत-गात साजरे करा प्रत्येक क्षण
मिठाई वाटून वाढवा सणाचा गोडवा 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

5. नूतन वर्षामध्ये दुःख-संकट तुमच्यापासून राहो दूर
एकटेपणाचा कधीही करावा लागू नये सामना
तुमचे प्रत्येक स्वप्न होवो पूर्ण, हीच आहे मनापासून इच्छा  
मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy Gudi Padwa 2024)

6. पुरणपोळीचा नैवेद्य
सुरेख रांगोळीने सजले द्वार
गुढीपाडव्याच्या सणामुळे 
सर्वत्र दिसत आहे आनंदीआनंद
Gudhi Padwyachaya Hardik Shubhechha 2024!

7. चैत्र महिन्याची सोनेरी पहाटे  
नवे स्वप्न, नव्या दिशा 
नवी सुरुवात, नवा विश्वास  
नवीन वर्षाची करूया जल्लोषात सुरुवात 
Happy Gudhi Padwa 2024

8. नवी पहाटे एका नव्या किरणासह 
नवा दिवस एका सुंदर हास्यासह 
मराठी नूतन वर्ष तुमच्यासाठी ठरो सुख-समृद्धीचे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

9. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 
तुम्हाला श्री गणेशाचा मिळो आशीर्वाद
सरस्वती मातेकडून मिळो विद्या
महालक्ष्मी मातेकडून मिळो धनसंपदा
तुमच्यावर होवो सुख-आनंदाचा वर्षाव 
सर्वांकडून मिळो प्रेम-सन्मान, याच आमच्या कायम सदिच्छा 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

10. सर्वत्र आहेत आनंदाचे क्षण  
सुंदर रांगोळी सजलंय अंगण
तुमच्या जीवनामध्ये होवो सुखाचा वर्षाव
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

11. नवी पहाट
नवा दिवस
चला एकत्रित साजरा करूया
गुढीपाडव्याचा सण
सदैव अशीच एकमेकांना देऊया साथ
गुढीपाडव्याचा हार्दिक शुभेच्छा 2024!

12. घरामध्ये येवो शुभ संदेश
प्रत्येक क्षणी मिळो आनंदवार्ता
गत वर्षाला करूया अलविदा
तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

13. गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
हे नूतन वर्ष तुमच्यासाठी सुख-समृद्धी व भरभराटीचे ठरो. 

14. प्रत्येक वर्ष काही-न्-काही शिकवून जाते
प्रत्येक नवीन वर्ष नव्या संधी घेऊन येते
आनंदाने, हसतमुखाने करूया नव्या वर्षाचे स्वागत
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

15.  येणाऱ्या नवीन वर्षातील प्रत्येक दिवशी
आनंद व उत्साह साजरा करण्याची मिळो संधी 
नूतन वर्षामध्ये सर्व स्वप्न होवो पूर्ण
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा :

Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

भूतान फिरायचं असेल तर IRCTC चं हे पॅकेज आहे बेस्ट! फक्त 6 दिवसांमध्ये घ्या ट्रिपचा आनंद

Carrot-Orange Soup: नितीन गडकरींच्या नागपुरातील प्रसिद्ध संत्र्याच्या सूपची चव चाखलीय? घरच्या घरी असे तयार सूप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination