जाहिरात
This Article is From Mar 11, 2024

Carrot-Orange Soup: नितीन गडकरींच्या नागपुरातील प्रसिद्ध संत्र्याच्या सूपची चव चाखलीय? घरच्या घरी असे तयार सूप

पण तुम्ही कधी संत्र्याचे सूप प्यायले आहे का? हो तुम्ही वाचलंय ते बरोबर आहे.

Carrot-Orange Soup: नितीन गडकरींच्या नागपुरातील प्रसिद्ध संत्र्याच्या सूपची चव चाखलीय? घरच्या घरी असे तयार सूप

Carrot And Orange Soup: फिट राहण्यासाठी हल्ली बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लान फॉलो करतात. या सर्व डाएट प्लानमधील एक सामान्य असणारा मेनू म्हणजे ‘सूप'. शारीरिक समस्या आणि आरोग्याच्या गरजांनुसार प्रत्येकजण तज्ज्ञांनी सुचवलेले सूप डाएट फॉलो करतात. आपण देखील आजवर कित्येक प्रकारच्या सूपची चव चाखली असेल. 

पण तुम्ही कधी संत्र्याचे सूप प्यायले आहे का? हो तुम्ही वाचलंय ते बरोबर आहे. संत्र्याच्याच सूपच्या चवीबद्दल आम्ही तुम्हाला विचारत आहेत. नुकतेच एका मुलाखतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरामध्ये संत्र्याचे सूप अतिशय लोकप्रिय असल्याचे सांगितले.  

संत्र्याचे सूप प्यायल्यास शरीरास मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. संत्र्याच्या सूपमध्ये गाजराचाही समावेश केला जातो. ज्याद्वारे आरोग्यास ‘व्हिटॅमिन ए'चा पुरवठा होतो. चला तर जाणून घेऊया संत्रे व गाजराच्या पौष्टिक सूपची रेसिपी…  

सामग्री 
तेल - एक चमचा
बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात - दोन  
गाजर - सहा
कढीपत्त्याची पावडर - दोन चमचे 
लिंबाच्या सालीचा किस -  एक चमचा
संत्र्याचा रस - एक कप  
नारळाचे दूर - एक कप
काळी मिरी पावडर - आवश्यकतेनुसार 
पुदिन्याची पाने - आवश्यकतेनुसार

संत्रे-गाजराच्या सूपची पाककृती 

- गॅसच्या मध्यम आचेवर एक मोठे पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर तेल ओतावे. तेलामध्ये चिरलेली कांद्याची हिरवी पात परतून घ्यावी.
- यानंतर गाजराचा किस, कढीपत्त्याची पावडर, लिंबाच्या सालीचा किस आणि संत्र्याचा रस मिक्स करावा. गाजर शिजेपर्यंत रस उकळू द्यावा.
- आता यामध्ये नारळाचे दूध आणि हवे असल्यास तुमच्या आवडीच्या भाज्या चिरून त्यामध्ये मिक्स करू शकता. 
- मिश्रणाला चांगला उकळ येऊ द्या. 
- सर्व सामग्री शिजल्यानंतर गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ द्यावे. यानंतर मिश्रण मिक्सरमध्ये वाटून सर्व सामग्री वाटून घ्यावी. 
- वाटलेले मिश्रण गाळून घ्यावे आणि ते पुन्हा पॅनमध्ये हलकेसे गरम करावे. 
- चार ते पाच मिनिटांसाठी सूप गरम करावे. 
- यानंतर वरून काळीमिरी पावडर आणि पुदिन्याची पाने मिक्स करावी. 
- गरमागरम पौष्टिक सूपचा आस्वाद घ्यावा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com