Haritalika Vrat 2024: भाद्रपद शुद्ध तृतीयेचे हरितालिका हे व्रत कुमारीकांनी मनासारखा पती मिळावा यासाठी तसेच सौभाग्यवतींनी पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून आवर्जून करावे, असे म्हणतात. हरितालिका हे देवी पार्वतीचेच एक नाव त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान महादेवांना वर स्वरुपात प्राप्त केले, याचीच आठवण म्हणून हे व्रत केले जाते.
तुम्हाला देखील हरितालिका तृतीयेचे व्रत करायचे आहे का? तर ही माहिती नक्की जाणून घ्या.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेबाबत सविस्तर माहिती)
हरितालिका तृतीया कधी आहे? (When Is Haritalika Teej 2024?)
यंदा हरितालिका तृतीया (Haritalika Tritiya 2024) 6 सप्टेंबर 2024 रोजी आहे, याची तिथी शुक्रवारी 5 सप्टेंबर 2024 दुपारी 12:21 वाजता सुरू होणार आहे, तर 6 सप्टेंबर दुपारी 3:01 वाजता तिथी समाप्त होईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 6:01 वाजेपासून ते सकाळी 8:32 वाजेपर्यंत आहे.
- सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा.
- उगवत्या सूर्यदेवाचे दर्शन करून त्यास अर्घ्य द्यावे.
- घरातील देवांची नेहमीप्रमाणे पूजा करावी.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: कधी आहे गणेश चतुर्थी? गणेशोत्सवादरम्यान जुळून आले मोठे योग, जाणून घ्या माहिती)
पूजेची मांडणी
- पूजेची जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडावे.
- रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा.
- चौरंगावर पांढरे सूती/रेशमी वस्त्र अंथरुन महादेवीची पिंड ठेवावी अथवा शंकरपार्वतीची प्रतिमा ठेवावी.
- महादेवाच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर गणेश मूर्ती/सुपारी ठेवावी. गणेशमूर्तीसमोर वाटीत गूळखोबरे ठेवा.
- गणेशमूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवा.
- मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोथी ठेवा आणि पूजेभोवती रांगोळी काढा.
पूजा सामग्री
अष्टगंध, अक्षता, भस्म, हळदी-कुंकू, फुले, पत्री, दुर्वा, बेलपत्र, धूप, तुपाचे निरांजन, खडीसाखर, कलश, ताम्हण, पळी, पेला, विड्याची पाने, खारीक, बदाम, सुपारी, नाणी, यथाशक्ती दक्षिणा, खण, गळेसरी, बांगड्या इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी ठेवावे.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाची स्थापना का करतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण)
या गोष्टी लक्षात ठेवा
- महिलांनी फराळ करू नये केवळ फलाहार करावा.
- पूजा केल्यानंतर संध्याकाळी पूजेस धूपदीप ओवाळून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
- दुसऱ्या दिवशी पूजेवरील निर्माल्य काढून पिंडींना गंध, भस्म, अक्षता, हळदी-कुंकू, फुले आणि बेलपत्र अर्पण करा.
- धूप, दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा.
- गणपती, हरितालिका आणि भगवान महादेवाची क्रमाने आरती करावी.
- आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा आणि मंत्रपुष्पांजली म्हणून फुले-बेलपत्र अर्पण करा.
- विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही-भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Khopoli | बाप्पाच्या आगमनाची अंतिम तयारी, खोपोलीतील बाजारपेठेमध्ये गणेश भक्तांची खरेदीसाठी गर्दी