Ganesh Chaturthi 2024: दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस धुमधडाक्यात साजरे केले जातात. भाविक दहा दिवस लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करतात. थाटामाटात सोहळा साजरा केला जातो. भाविक घरोघरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून त्याची विधीवत पूजा करतात. देशभरात मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा केला जातो. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान मोठमोठ योग जुळून आले आहेत, याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पासाठी तयार करा रोझ फ्लेव्हर मोदक)
गणेश चतुर्थी 2024 कधी आहे? l Ganesh Chaturthi 2024
भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 6 सप्टेंबरला 3:01 वाजता सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5:37 वाजता तिथी समाप्त होईल. सूर्यादयानुसार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी भाविक सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तसेच घरोघरी गणेशमूर्तीची स्थापना करतील. 7 सप्टेंबर रोजी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 03 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. गणेश मूर्तीची स्थापना केल्यानंतर पूजनासाठी 2 तास 31 मिनिटांचा वेळ अतिशय शुभ आहे.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला मोदकांचाच नैवेद्य का अर्पण करतात?)
गणेश चतुर्थीदरम्यान जुळून आलेले योग
- यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ योग जुळून आले आहेत.
- सकाळी सुरू होणारा ब्रह्म योग रात्री 11 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल.
- यानंतर इंद्र योग देखील जुळून आला आहे.
- पहाटे 6:02 वाजेपासून ते दुपारी 12:34 वाजेपर्यंत रवि योग आहे.
- सर्वार्थ सिद्धि योग 12:34 मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी (8 सप्टेंबर)पहाटे 6:03 वाजेपर्यंत असेल.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाची स्थापना का करतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण)
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Bhandara | उच्चशिक्षित तरुणाने जोपसली शिल्पकला, भंडाऱ्याच्या हरदोली गावात जोपसली कला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world