Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाविक लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन करण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला बाप्पाच्या मूर्तीची विधीवत पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. पण गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना कशासाठी केली जाते? यामागील कारण माहिती आहे का? राजेंद्र भट यांनी याबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे, जाणून घेऊया....
राजेंद्र भट यांनी गणेशोत्सवामागील नेमके विज्ञान समजावून सांगितले आहे. भट यांनी दिलेल्या माहितीनुसार,गणपती बाप्पा हे समृद्धीची देवता आहे. समृद्धी निर्माण होण्यासाठी मुळात जमीन खूप समृद्ध होणे आवश्यक आहेत. मातीची समृद्धी करण्याकरता पार्थिव गणेश निर्माण झाला असावा, असे त्यांना वाटते. यामागील विज्ञान म्हणजे गणपतीची मूर्ती मातीपासूनच घडवायची, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे म्हणजे मूर्तीमध्ये प्राण आणणे, त्यामध्ये जीवाणूंची निर्मिती करणे आणि मग ही मूर्ती सजीवपणात विसर्जन करणे. मूर्तीचे विसर्जन नदी किंवा तलावामध्ये केल्यानंतर उर्वरित माती शेतामध्ये टाकून मातीची समृद्धी करावी.
(नक्की वाचा: सणासुदीच्या काळात गोड पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचाय? फॉलो करा या टिप्स)
माती समृद्ध करण्याकरता आपल्याला गणपतीची मूर्ती मातीपासूनच घडवणे आवश्यक आहे आणि ती काही दिवसांपूर्वीच करणे गरजेचे आहे. कारण मूर्तीमध्ये ओलावा टिकला पाहिजे, हा ओलावा टिकून ठेवणं आणि प्राणप्रतिष्ठा करताना मूर्तीवर मध-तुपाने अभिषेक करणे, पत्री वाहने इत्यादी या सर्व परंपरांमागे वैज्ञानिक कारण आहे.
(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)
मातीची मूर्ती कशी घडवावी, याबाबतही राजेंद्र भट यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
बाप्पाची मूर्ती कशी घडवावी?
- आपल्या शेतातील किंवा एखाद्या झाडाखालील माती घ्यावी.
- माती घरी आणल्यानंतर सुकावावी.
- माती नीट स्वच्छ करावी, त्यातील दगड वगैरे काढावे.
- त्यामध्ये थोडेसे शेण घालावे आणि माती भिजवताना गोमूत्र घालावे.
- यानंतर त्यापासून गणपतीची मूर्ती तयार करावी.
पाहा पूर्ण व्हिडीओ
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world