जाहिरात

Health Benefits Of Eating Curd Daily: सलग 30 दिवस दही खाल्ल्यास मिळतील हे 5 मोठे फायदे

Health Benefits Of Eating Curd Daily: रोज दही खाल्ल्यास आरोग्यास कोणकोणते फायद मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Health Benefits Of Eating Curd Daily: सलग 30 दिवस दही खाल्ल्यास मिळतील हे 5 मोठे फायदे
" Health Benefits Of Eating Curd Daily: रोज दही खाल्ल्यास काय होते?"
Canva

Health Benefits Of Eating Curd Daily: दही हे भारतीयांच्या आहारातील महत्त्वपूर्ण भाग आहे. दह्याला सुपरफुडही म्हटले जाते. प्रोबायोटिक्सचा उत्तम साठा असलेले दही आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते, यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. दह्यातील चांगल्या बॅक्टेरियांमुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते. याव्यतिरिक्त दह्यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी 12, प्रोटीन यासारखे पोषणतत्त्वही जास्त प्रमाणात आहेत; ज्याद्वारे शरीराची हाडे मजबूत राहण्यासह शरीरातील ऊर्जाही टिकून राहते. 

नियमित दह्याचे सेवन केल्यास शरीराला कोणकोणते फायदे मिळतील? Health Benefits Of Eating Curd Daily

रोज दही खाण्याचे फायदे |  Curd Benefits 

निरोगी हृदय 

दह्याचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यातील पोषणतत्त्व शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. शिवाय दह्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबाची पातळीही नियंत्रणात राहते. 

पचनप्रक्रिया सुधारते 

दह्यातील प्रोबायोटिक्समुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यातील चांगल्या बॅक्टेरियांमुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरियांचा खात्मा होऊन पचनप्रक्रिया सुधारते. पोटातील गॅस, पोट फुगणे, आतड्यांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.  

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर | Weight Loss Tips 

दह्यातील कॅल्शिअम शरीरातील कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोनचा स्त्राव नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. या हार्मोनमुळे पोटाच्या भागाजवळ चरबी जमा होऊ लागते. नियमित एक वाटी दही खाल्ल्यास कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होण्यासह पोटावरील चरबी घटण्यासही मदत मिळते. 

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती 

दह्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. यातील चांगल्या बॅक्टेरियांमुळे शरीराला संसर्गांविरोधात लढण्यास मदत मिळते. पण मर्यादित स्वरुपातच दह्याचे नियमित सेवन करावे.    

Papaya Benefits: रोज पपई खाल्ल्यास काय होईल? कधी खावं हे फळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान

(नक्की वाचा: Papaya Benefits: रोज पपई खाल्ल्यास काय होईल? कधी खावं हे फळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान)

हाडे आणि दात मजबूत होतील

कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे उत्तम स्त्रोत म्हणजे दही. दह्यातील खनिजांमुळे शरीराची हाडे आणि दात मजबूत होतात. 

Jwari vs Nachani Roti: ज्वारी की नाचणी, वेटलॉससाठी कोणती पोळी खावी?

(नक्की वाचा: Jwari vs Nachani Roti: ज्वारी की नाचणी, वेटलॉससाठी कोणती पोळी खावी?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com