- आयुर्वेदिक डॉक्टर रूचा पै
Urinary Tract Infection Causes And Symptoms: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे आरोग्यावर विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. यापैकीच लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारी समस्या म्हणजे युटीआय. युटीआय म्हणजे मूत्रमार्गातील जंतू संसर्ग. या समस्येमुळे वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ-वेदना होणे यासह अन्य त्रासाचाही सामना करावा लागतो. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर रूचा पै यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
UTI म्हणजे काय? | What Is Urinary Tract Infection?
- UTI म्हणजे मूत्राशयामध्ये जंतूंचा संसर्ग होणे.
- आयुर्वेदात हा विकार मूत्रकृच्छ्र या नावाने ओळखला जातो. शरीरामध्ये वात-पित्त दोष वाढल्यामुळे हा विकार होतो.
मूत्रमार्गामध्ये संसर्ग होण्यामागील कारणे | Urinary Tract Infection Causes| UTI Causes In Marathi
मूत्रमार्गामध्ये जंतू संसर्ग होण्यामागील कारणे जाणून घेऊया...
- वारंवार लघवी थांबवणे.
- तिखट, आंबट आणि खारट पदार्थ अशा पित्तवर्धक आहाराचे सेवन करणे.
- पाणी कमी प्रमाणात पिणे.
- वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे.
- सिंथेटिक प्रकारचे अंतर्वस्त्र परिधान करणे.
मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाला असल्यास कोणते लक्षणे आढळतात | Urinary Tract Infection Symptoms| UTI Symptoms In Marathi
- लघवी करताना जळजळ / वेदना होणे.
- वारंवार लघवीस होणे पण थोड्याच प्रमाणात होणे.
- ओटीपोट किंवा कंबरेच्या भागामध्ये वेदना होणे.
रक्तातील साखर वाढल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात?
रक्तातील साखर वाढल्यास मूत्रपिंड ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. परिणामी
- वारंवार लघवीला होणे.
- वारंवार तहान लागणे, थकवा जाणवणे.
- लघवीमध्ये साखर येऊन संसर्ग वाढतो.
- हे मधुमेहाशी संबंधित मूत्रविकार असू शकतात.
शरीरातील Vitamin B12च्या कमतरतेचे परिणाम
- शरीरामध्ये व्हिटॅमिन B12चे प्रमाण कमी झाल्यास मूत्राशय नियंत्रित करणाऱ्या नसा कमकुवत होतात.
- वारंवार लघवीला होणे / त्यावरील नियंत्रण कमी होणे.
- रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीस होणे.
- स्नायू-मज्जातंतूंचे असंतुलन होणे.
- ही वात दोष वृद्धीचे लक्षणं मानली जातात.
- शिंक किंवा खोकला आल्यावर लघवीवरील नियंत्रण सुटणे, या समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.
- विशेषतः प्रसूतीनंतर किंवा वय वाढल्यानंतरही ही समस्या निर्माण होऊ शकते.
- वैद्यकीय भाषेमध्ये या स्थितीस स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स (SUI) असे म्हणतात.
(नक्की वाचा: Stomach Cleansing Tips: पोटातील घाण सकाळी पटकन येईल बाहेर, फक्त खा ही आयुर्वेदिक पावडर)
शरीरामध्ये लघवी रोखून ठेवण्याचं कार्य ओटीपोटातील स्नायू (Pelvic Floor Muscles) आणि मूत्रमार्गातील स्नायू (Urethral Sphincter) करतात. पण या भागातील स्नायू कमकुवत झाल्यास कोणत्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो? जाणून घेऊया...
- शिंकताना, खोकताना, हसताना किंवा धावताना पोटातील दाब वाढतो.
- यामुळे थोडीशी लघवी मूत्रमार्गाद्वारे बाहेर येते.
- हा त्रास वारंवार होत असल्यास ओटीपोटीतील स्नायू मजबूत करण्यासाठी थेरपी आणि आयुर्वेदिक उपचार एकत्रित करणं प्रभावी ठरेल.
(नक्की वाचा: Frequent Urination Causes:रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय? दूध किंवा पाण्यात मिक्स करा या गोष्टी, पाहा कमाल)
मूत्रमार्गातील जंतू संसर्ग कमी करण्यासाठी आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय | Urinary Tract Infection Treatment1. धण्याचे पाणी | Coriander Seed Water Benefits- रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाण्यात एक चमचा अख्खे धणे भिजवून ठेवा.
- सकाळी उठल्यानंतर त्यामध्ये थोडेसे गूळ मिक्स करा.
- हा उपाय केल्यास लघवीमुळे होणारी जळजळ, शरीरातील उष्णता आणि पित्तजन्य दाह कमी होण्यास मदत मिळेल.
- दुर्वा रस प्यायल्यास शरीराला थंडावा मिळेल.
- 10-12 दुर्वा काड्या स्वच्छ धुऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचा रस काढा आणि सकाळी रिकाम्या पोटी 10-15 Ml प्रमाणात रस प्यावा.
- यामुळे मूत्रमार्गामध्ये होणारी जळजळ कमी होईल.
- रक्तशुद्धी आणि पित्त दोषाचा त्रास कमी होईल.
- रोज रात्री 1-2 खारीक (वाळवलेले खजूर) दुधासोबत उकळून प्या.
- मूत्राशयाशी संबंधित समस्या दूर होतील, थकवा दूर होऊन शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल.
- रात्री झोपण्यापूर्वी मूठभर गहू पाण्यात भिजत ठेवा.
- सकाळी उठल्यानंतर पाणी गाळा आणि त्यामध्ये खडीसाखर मिक्स करा.
- सात दिवस हा उपाय केल्यास मूत्रमार्गामध्ये होणारी जळजळ कमी होईल.
- ताजी कोथिंबीर धुवून पाण्यामध्ये उकळा, थंड झाल्यावर कोथिंबीर मॅश करुन ते पाणी प्यावे.
- हे पाणी दिवसभरात दोन ते तीन वेळा प्यावे.
- शरीरातील पित्त शांत होईल, लघवी करताना त्रास होणार नाही.
(नक्की वाचा: Kidney Stones Treatment: मूतखड्यांच्या समस्येतून पटकन सुटका हवीय? या फळाचा काढा प्या, वाचा फायदे)
6. गरम पाण्याचा शेक घ्यावा- दररोज सकाळी 10-15 मिनिटं ओटीपोटाच्या भागास गरम पाण्याने शेक द्यावा.
- यामुळे ओटीपोटाच्या भागातील सूज, जळजळ आणि वेदना कमी होतील तसेच या भागातील रक्तप्रवाह सुधारेल.
- उष्ण, आंबट, तिखट पदार्थांचे सेवन करणं टाळा.
- भरपूर पाणी, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस प्यावा.
- लघवी रोखून ठेवू नये.
- कापडी अंडरगारमेंट्स वापरा.
- नियमित भुजंगासन, धनुरासन, आणि पवनमुक्तासनाचा सरावा करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

