जाहिरात

Pudina Benefits: पुदिन्याचे सेवन करणं 9 लोकांसाठी ठरेल वरदान, उन्हाळ्यात पुदिना खाण्याची योग्य पद्धत वाचा

Pudina Health Benefits: डाएटमध्ये पुदिन्याचा समावेश केल्यास कोणकोणते फायदे मिळतील? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Pudina Benefits: पुदिन्याचे सेवन करणं 9 लोकांसाठी ठरेल वरदान, उन्हाळ्यात पुदिना खाण्याची योग्य पद्धत वाचा
"Mint Benefits: पुदिना खाण्याचे 9 फायदे"
Canva

Pudina Health Benefits: कडक उन्हात शरीराला थंडावा मिळावा, यासाठी आहारामध्ये पुदिन्याचा समावेश करणं हा सर्वात उत्तम आणि सोपा नैसर्गिक उपाय आहे. पुदिन्याच्या छोट्या हिरव्यागार आणि सुगंधी पानांमुळे केवळ मूडच चांगला होत नाही तर शरीराला थंडावाही मिळतो. उन्हाळ्यात पुदिना खाल्ल्यास अनेक आजारांपासूनही बचाव होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात पुदिन्याची चटणी, रायते, रस, पन्हे, कोशिंबीर किंवा पाण्यात पुदिना मिक्स करून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळेल. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा पुदिना हा सर्वात सोपा मार्ग आहे.  

पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits of Pudina)

1. पचनप्रक्रिया
पुदिन्यातील गुणधर्मामुळे शरीराची पचनसंस्था मजबूत होण्यास मदत मिळेल. अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका होईल आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

2. पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
डिहायड्रेशनची समस्या रोखण्यासाठी पुदिना प्रभावी उपाय आहे. उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही आणि दिवसभर ताजेतवाने वाटेल.

3. डोकेदुखी 
पुदिन्यामुळे डोकेदुखी आणि तणाव कमी होण्यास मदत मिळेल. डोकेदुखी आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी पुदिन्याचा चहा पिणे फायदेशीर ठरेल.

4. ऊर्जा (Energy)
सकाळी रिकाम्या पोटी पुदिन्याचे पाणी प्यायल्यास शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळेल. 

5. रोगप्रतिकारशक्ती (Immunity)
पुदिन्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आजारांपासून आरोग्याचे संरक्षण होईल.

6. घामाची दुर्गंधी
पुदिन्याच्या सेवनामुळे घामाची दुर्गंधी कमी होते किंवा पूर्णपणे नष्ट होते.

(नक्की वाचा: 30 Days Salad Eating Benefits: सलग 30 दिवस सॅलेड खाल्ल्यास काय होते? आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे आणि तोटे)

7. लठ्ठपणा
पुदिन्यातील घटकांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात पुदिन्याचा समावेश करावा.

8. सूज
पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि अँटी-मायक्रोबिअल (Antimicrobial) गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील सूज कमी होऊ शकते.

(नक्की वाचा: Weight Loss Tips: तरुणीने 90 Kgवरून थेट 55kg वजन घटवलं, ना जिम ना डाएटिंग; वाचा वेटलॉस जर्नी)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

9. हृदय
हृदयरोग असलेल्या रुग्णांनी पुदिन्याचे सेवन करणं फायदेशीर मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com