जाहिरात

Walnut Benefits: दिवसभरात 20 अक्रोड खाल्ले तर काय होईल? अक्रोडशी संबंधित 11 प्रश्नांची महत्त्वपूर्ण उत्तरं

Walnut Eating Benefits: अक्रोड हा एक छोटासा सुकामेवा आहे, पण याद्वारे मिळणारे फायदे अगणित आहेत. मेंदू, हृदयासह शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीसाठीही अक्रोड खाणे लाभदायक ठरते.

Walnut Benefits: दिवसभरात 20 अक्रोड खाल्ले तर काय होईल? अक्रोडशी संबंधित 11 प्रश्नांची महत्त्वपूर्ण उत्तरं
"Walnut Eating Benefits: अक्रोड खाण्याचे फायदे"
Canva

Walnut Eating Benefits: अक्रोड केवळ चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. याद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना ऊर्जा मिळते आणि कित्येक आजारांपासूनही बचाव होतो. अक्रोड खाण्याची योग्य पद्धत आणि याद्वारे कोणकोणते लाभ मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

1. अक्रोड भिजवून खाणे का आवश्यक आहे? (Why is it necessary to soak walnuts before eating?

अक्रोडची प्रकृती उष्ण आहे, अक्रोड न भिजवता खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पोटात गॅस होणे, जळजळणे यासारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी अक्रोड काही तासांसाठी पाण्यात भिजत ठेवून खा. यामुळे अक्रोडमधील एंझाइम्स सक्रिय होतील, ज्यामुळे शरीराला पोषणतत्त्व शोषून घेण्यास मदत मिळेल. आयुर्वेदामध्येही अक्रोड भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम होतील. उन्हाळ्यातही शरीरातील उष्णता वाढू नये म्हणून अक्रोड भिजवून खावे.  

2. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे फायदेशीर आहे का? 

रोज सकाळी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले अक्रोड खाणे फायदेशीर ठरेल. कारण पोट रिकामं असते तेव्हा शरीराला पोषणतत्त्व योग्य पद्धतीने शोषून घेण्यास मदत मिळते. सकाळी अक्रोड खाल्ल्यास यातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन आणि अन्य पोषणतत्त्व शरीर पूर्णपणे शोषून घेते, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि दिवसभरात शरीरातील ऊर्जा टिकून राहते. स्मरणशक्ती, एकाग्रता शक्ती सुधारते आणि मानसिक थकवा दूर होतो. 

3. दिवसभरात किती प्रमाणात अक्रोडचे सेवन करावे? (How Many Walnuts To Eat Per Day)

अक्रोडचा तुम्ही नाश्त्यामध्ये समावेश करू शकता. दिवसभरात चार ते सहा अक्रोड खाणे पुरेसे मानले जाते. 

4. अक्रोड खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळतात? हिवाळ्यात अक्रोड का खाल्ले पाहिजे?

उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा आणि उष्णतेची आवश्यकता असते, अक्रोडद्वारे शरीराला या दोन्ही गोष्टींचा पुरवठा होईल. उन्हाळ्यात अक्रोड खाल्ल्यास हाडे मजबूत होतील आणि सांधेदुखी यासारख्या समस्या कमी होतील. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि झिंक यासारख्या तत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. 

5. मेंदूला कोणते फायदे मिळतात? 

मेंदूचा विकास आणि कार्यप्रणाली सुधारण्यासाठी आवश्यक असणारे ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड अक्रोडमध्ये आहे. अक्रोडच्या सेवनामुळे स्मरणशक्ती वाढणे, लक्ष्य केंद्रित होण्यासह मानसिक थकवाही दूर होतो. 

6. हृदयाच्या आरोग्यासाठी अक्रोड खाणे लाभदायक ठरेल का?

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यामध्ये अक्रोड महत्त्वपूर्ण भूमिका निभावते, यातील पॉली-अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी घटवतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाबाची पातळी संतुलित राहते आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो. जी मंडळी नियमित अक्रोड खातात, त्यांच्यामध्ये हृदयविकार आणि पक्षाघात यासारखे आजार कमी प्रमाणात आढळतात. याव्यतिरिक्त शरीरातील रक्तप्रवाही सुधारतो. 

(नक्की वाचा: Walnuts Benefits: भिजवलेले अक्रोड खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? डॉक्टर म्हणाले सकाळी नव्हे ही आहे बेस्ट वेळ)

7. अक्रोड खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारते का?

अक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. आतड्या आतील बाजूने स्वच्छ होण्यास आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. पचनप्रक्रिया चांगली असेल तर शरीराच्या अन्य अवयवांचे कामही योग्य पद्धती सुरू राहते. अक्रोडमधील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील विषारी घटकही बाहेर फेकले जातात. तसेच आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांचीही निर्मिती होण्यास मदत मिळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होते आणि संसर्गजन्य आजारांचा धोकाही कमी होतो.  

8. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास कशी मदत मिळते? 

धकाधकीच्या जीवनामध्ये शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणं आवश्यक आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.   

9. अक्रोडचे किती प्रमाणात सेवन करावे? 

अक्रोडचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन करावे. नियमित तीन ते चारपेक्षा जास्त प्रमाणात अक्रोड खाऊ नये. कारण अक्रोडची प्रकृती उष्ण असते, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढणे, तोंड येणे यासह अन्य समस्या निर्माण होऊ शकतात.

(नक्की वाचा: Walnuts Benefits: अक्रोड खाणे या 4 लोकांसाठी ठरेल वरदान)

10. दिवसभरात 20 अक्रोड खाल्ल्यास काय होते? 

दिवसभरात 20 अक्रोड खाणे प्रमाणापेक्षा जास्त ठरेल, यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतील. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच डाएटमध्ये अक्रोडचा समावेश करावा. दिवसभरात 20 अक्रोड खाल्ल्यास शरीराचे वजन वाढणे, पचनाशी संबंधित समस्या, अ‍ॅलर्जी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  

11. एक किलोग्रॅम अक्रोडची किंमत किती आहे? 

वेगवेगळ्या शहरांमध्ये अक्रोडची किंमत वेगवेगळी असू शकते. भारतामध्ये एक किलोग्रॅम अक्रोडची किंमत जवळपास 500 ते 1200 रुपये इतकी असू शकते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com