Jeere Dhane Owa Badishep Water: सकाळची सुरुवात चांगल्या गोष्टींपासून तसेच पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करुन करावी, असे म्हणतात. यामुळे शरीराची कार्यप्रणाली सुरुळीत सुरू राहते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी डिटॉक्स वॉटर पिणे फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जीरे, बडिशेप, धणे आणि ओव्याचे पाणी पिणे (Detox Drinks Benefits) लाभदायक ठरू शकते.
- जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी3, व्हिटॅमिन बी6, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक आणि फायबर यासारखे गुणधर्म आहेत.
- बडिशेपमध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे.
- धण्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन केसह खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असे गुणधर्म आहेत.
- ओव्यामध्ये असंख्य औषधी गुणधर्मांचा साठा आहे.
या सर्व गोष्टी एकत्रित करुन त्याचे पाणी कसे तयार करावे आणि कोणते फायदे मिळतील? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
जीरे, ओवा, बडिशेप, धण्याचे पाणी कसे तयार करावे? (How To Make Jeera Dhaniya Ajwain Saunf Water)
- ग्लासभर पाण्यात एक चमचा जीरे, एक चमचा बडिशेप, एक चमचा धणे आणि एक चमचा ओवा मिक्स करा.
- सर्व सामग्री रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी एका भांड्यामध्ये हे पाणी गरम करावे.
- हवे असल्यास पाण्यात लिंबाचा रस मिक्स करू शकता.
- पाणी तयार झाल्यानंतर गाळून प्यावे.
जीरे, ओवा, बडिशेप, धण्याचे पाणी पिण्याचे फायदे (Jeera Dhaniya Ajwain Saunf Benefits)
1. लठ्ठपणा
जेवल्यानंतर तुम्ही जीरे, बडिशेप, धणे आणि ओव्याचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
2. बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे हैराण असाल तर ओवा, जीरे, बडिशेप, धण्याचे पाणी फायदेशीर ठरेल.
(नक्की वाचा: Curd Benefits: दही कोणत्या महिन्यात खाऊ नये, दही खाण्याची योग्य वेळ कोणती? नुकसान-फायद्यांसह जाणून घ्या 8 FAQs)
3. त्वचेचे आरोग्य
त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होतील. कारण या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील. त्वचेवर नैसर्गिक तेज येईल.
4. पोटाचे आरोग्य
उन्हाळा ऋतूमध्ये पोटाची जळजळ शांत करण्यासाठी हे डिटॉक्स वॉटर पिऊ शकता.
(नक्की वाचा: Loaded Water Social Media Trend: लोडेड वॉटर म्हणजे काय? फिटनेसप्रेमींमधील नव्या ट्रेंडचा धुमाकूळ, वाचा फायदे)
5. रोगप्रतिकारकशक्तीधणे, बडिशेप, ओवा आणि जिऱ्याच्या पाण्याद्वारे शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल, शरीराचे संसर्गापासून संरक्षण होईल आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Coriander Water Benefits: सलग 15 दिवस धण्याचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरामध्ये होईल मोठा बदल)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)