Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात या काळ्या बियांची पावडर मिक्स करुन प्या, मिळतील अद्भुत लाभ

Kalonji Powder Benefits With Warm Water: रात्री झोपण्यापूर्वी या काळ्या रंगाच्या बियांची पावडर मिक्स करुन प्यायल्यास आरोग्यास असंख्य लाभ मिळतील. जाणून घ्या सविस्तर माहिती..

जाहिरात
Read Time: 2 mins
"Weight Loss Tips: काळ्या बियांची पावडर खाण्याचे फायदे"

Kalonji Powder Benefits With Warm Water: प्रत्येकाच्या घरामध्ये गरम मसाल्यांचा स्वतंत्र डबा असतो. या मसाल्यांमुळे अन्नाची चव वाढतेच शिवाय आरोग्यासही असंख्य लाभ मिळतात. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला कलौंजी म्हणजे कांद्याच्या बियांची माहिती सांगणार आहोत. कलौंजीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तुम्ही देखील कलौंजीच्या पावडरचे सेवन केलं तर आरोग्यास अगणित लाभ मिळतील. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात कलौंजी पावडर मिक्स करून ते पाणी फायदेशीर ठरू शकते. 

रात्री कोमट पाण्यात कलौंजी पावडर मिक्स करुन पिण्याचे फायदे (Benefits of Kalonji Powder with Warm Water At Night in Marathi)

हृदयाचे आरोग्य राहील निरोगी

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात कलौंजीची पावडर मिक्स करुन प्यायल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. यामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: Belly Fat Loss Tips: पोटाची चरबी 1 महिन्यात इवल्याशा गोष्टीमुळे होईल कमी, फक्त 5 पानांमुळे शरीरात घडेल मोठा बदल)

शरीरावर आलेली सूज कमी होईल

कलौंजी पावडरमध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्ण आहेत, ज्यामुळे शरीरावर आलेली सूज कमी होण्यास मदत मिळू शकते. अवयवांवरील सूज कमी करण्यासाठी कलौंजीचे तेलही वापरू शकता.

Advertisement

(नक्की वाचा: Weight Loss: 3 महिन्यांत कमी होईल 20kg वजन, फॅट्स कमी करण्यासाठी फिटनेस कोचने सांगितल्या 10 स्टेप्स)

वेट लॉस

कलौंजीच्या पावडरमुळे वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. कलौंजीतील पोषणतत्त्वांमुळे मेटाबॉलिज्म आणि पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल. यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल.  

त्वचेसाठी फायदेशीर

कलौंजीच्या पावडरमुळे त्वचेचे आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळेल. नियमित स्वरुपात कोमट पाण्यात कलौंजी पावडर मिक्स करून प्यायल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल. शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर फेकले जातील, ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येईल.  

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )