
Belly Fat Loss Tips: भारतीय पाककृतींमध्ये फोडणीकरिता कढीपत्त्याच्या पानांचा आवर्जून वापर केला जातो. इवल्याशा पानांमुळे स्वयंपाक चविष्ट होतो. कढीपत्त्याची पाने केवळ स्वयंपाकाच्या चवीपुरती मर्यादित नाहीत, तर या पानांमध्ये औषधी गुणधर्मांचाही साठा आहे. यातील पोषणतत्त्वांमुळे वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कढीपत्त्याच्या पानांचा कशा पद्धतीने समावेश करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Photo Credit: Canva
वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे कसे करावे सेवन? (How To Consume Curry Leaves for Weight Loss)
कढीपत्त्याच्या पानांमध्ये कार्बेझोल आणि अल्कलाइन गुणधर्म आहेत, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. दात न घासता रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाच ते सात पाने व्यवस्थित चावून खा. यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल. याव्यतिरिक्त शरीरातील विषारी घटक देखील सहजरित्या बाहेर फेकले जातील.
(नक्की वाचा: Weight Loss: 3 महिन्यांत कमी होईल 20kg वजन, फॅट्स कमी करण्यासाठी फिटनेस कोचने सांगितल्या 10 स्टेप्स)
कढीपत्त्याच्या पानांचा चहा देखील तयार करुन पिऊ शकता. चवीसाठी चहामध्ये लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करावा. एका महिन्यातच तुम्हाला शरीरामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. कढीपत्त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अल्कलाइन गुणधर्मामुळे शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Yoga एक्सपर्ट 1 महिना मलासनात बसून प्यायली गरम पाणी, फायदे समजल्यानंतर तुम्हीही कराल सराव)

Photo Credit: Canva
कढीपत्ता खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Curry Leaves)
- कढीपत्त्याची पाने खाल्ल्यास वजन कमी होण्यासह पचनप्रक्रिया देखील सुधारते.
- कढीपत्त्याच्या पानांमध्ये मॅग्नेशिअम, फायबर, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट आणि कॉपर यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे. या घटकांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
- मधुमेहग्रस्तांनीही कढीपत्त्याची पाने खाणे फायदेशीर ठरेल.
- कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
- मेंदूच्या आरोग्यासाठीही कढीपत्त्यातील गुणधर्म पोषक आहेत.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world