जाहिरात

Weight Loss: 3 महिन्यांत कमी होईल 20kg वजन, फॅट्स कमी करण्यासाठी फिटनेस कोचने सांगितल्या 10 स्टेप्स

Weight Loss Tips: फिटनेस कोचने सांगितलेल्या दहा पद्धतींद्वारे तीन महिन्यांमध्ये तब्बल 20 किलोग्रॅम वजन घटवण्यास मदत मिळू शकते, कसे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Weight Loss: 3 महिन्यांत कमी होईल 20kg वजन, फॅट्स कमी करण्यासाठी फिटनेस कोचने सांगितल्या 10 स्टेप्स
Fitness coachने सांगितली 3 महिन्यात 20kg वजन घटवण्याची पद्धत

Weight Loss Tips: बदलत्या लाइफस्टाइलनुसार सर्वजण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी कित्येक प्रयत्न करत आहेत. अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव आणि शारीरिक हालचाल जास्त प्रमाणात नसेल तर शरीराचे अतिरिक्त वजन वाढू लागते. या वाईट सवयींमुळे काही लोकांचे वजन कमी करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. लठ्ठपणामुळे व्यक्तिमत्त्व तसेच आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. वजन वाढीच्या समस्येमुळे कित्येक गंभीर आजारांनाही आयते आमंत्रण मिळते. वजन वाढीमुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का? तुम्ही देखील उपाय शोधताय का? या आर्टिकलद्वारे जाणून घ्या सविस्तर माहिती...

फिटनेस कोच अनिता रॉयने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केलंय. या पोस्टमध्ये त्यांनी 10 महत्त्वपूर्ण पद्धतींची माहिती दिलीय, ज्याद्वारे केवळ तीन महिन्यांमध्ये 20 किलोग्रॅमपर्यंत वजन कमी केले जाऊ शकते.  

Belly Fat Loss Diet: सुटलेले पोट होईल सपाट, नियमित केवळ या इवल्याशा दोन गोष्टींचे करा सेवन

(नक्की वाचा: Belly Fat Loss Diet: सुटलेले पोट होईल सपाट, नियमित केवळ या इवल्याशा दोन गोष्टींचे करा सेवन)

स्टेप 1- डाएटमध्ये मसाल्यांचा समावेश करा 

अनिता रॉय यांनी सांगितले की, वेट लॉससाठी डाएट फॉलो करणं आवश्यक आहे. यासाठी डाएटमध्ये योग्य पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. डाएटमध्ये काळी मिरी, हळद, दालचिनी यासारख्या मसाल्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होते आणि फॅट्स जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळते. 

स्टेप 2- डाएटमधील प्रोटीनचे प्रमाण 

प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते, पण डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण योग्य असणं आवश्यक आहे. फिटनेस कोचच्या माहितीनुसार डाएटमध्ये डाळी, अंडी, चिकन, भाज्या यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. 

स्टेप 3- जेवणापूर्वी पाणी प्या 

जेवणाच्या पाच ते दहा मिनिटांपूर्वी एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि आवश्यकतेपेक्षा तुमच्या पोटामध्ये जास्तीचे अन्न जाणार नाही. 

Weight Loss News: वेटलॉससाठी शरीरावर इंजेक्शन, औषधांचा करताय मारा?  शॉर्टकटमुळे होतील इतके मोठे दुष्परिणाम

(नक्की वाचा: Weight Loss News: वेटलॉससाठी शरीरावर इंजेक्शन, औषधांचा करताय मारा? शॉर्टकटमुळे होतील इतके मोठे दुष्परिणाम)

स्टेप 4- छोट्या प्लेटचा वापर करावा 

फिटनेस कोचच्या मते, छोट्या प्लेटमध्ये जेवण केल्यास तुम्हाला वाटेल की तुम्ही जास्त प्रमाणात अन्नपदार्थांचे सेवन करताय.  

स्टेप 5- कमी कॅलरीज आणि जास्त प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थ

ताटामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असावे, उदाहरणार्थ अंडे, टोफू, डाळी इत्यादी

स्टेप 6- साखर आणि मैदा कमी करावा 

अनिता रॉय यांनी सांगितलंय की, साखर आणि रिफाइंड कार्ब्समुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. साखर-मैदा खाणे सोडले तर कमरेवरील चरबी कमी होण्यास मदत मिळेल.  

Yoga Day 2025: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव

(नक्की वाचा: Yoga Day 2025: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)

स्टेप 7- वजनावर नव्हे तर बदलावर लक्ष केंद्रीत करा 

फिटनेस कोचच्या माहितीनुसार, नियमित वजन तपासून पाहावे.  यासाठी तुमचे जुने कपडे आणि फोटोंमधील बदल देखील अनुभवत राहा. याद्वारे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल समजतील.  

स्टेप 8- 80/20 नियम फॉलो करा 

दरदिवशी 80 टक्के पौष्टिक पदार्थांचे सेवन करा आणि 20 टक्के स्वतःच्या आवडीचे खाद्यपदार्थ खा. कारण डाएट फॉलो करणं तुम्हाला कंटाळवाणे वाटता कामा नये.

स्टेप 9- आठवड्यातून दोन ते तीन वेळा व्यायाम करावा 

स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास स्नायू मजबूत होण्यास आणि शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होण्यास मदत मिळेल. यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा व्यायाम करावा. 

स्टेप 10- सातत्य टिकवून ठेवा

फिटनेस कोचने सांगितले की, परफेक्ट राहण्याची नव्हे पण वेटलॉस जर्नीमध्ये सातत्य टिकवून ठेवणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल. 

( Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com