जाहिरात

How To Stop Snoring: घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवायचीय? फॉलो करा 10 जबरदस्त टिप्स

How To Stop Snoring: घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. लाइफस्टाइलमध्ये छोटे-मोठे बदल केल्यानंतरही घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.

How To Stop Snoring: घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवायचीय? फॉलो करा 10 जबरदस्त टिप्स
"How To Stop Snoring: घोरण्याची समस्या रोखण्यासाठी कोणते उपाय करावे?"
Canva

How To Stop Snoring: झोपेत असताना घोरणे ही सामान्य समस्या आहे, पण याकडे दुर्लक्ष करणंही आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, झोपेत श्वास घेताना हवा घशातून प्रवाहित होते आणि या भागातील सैल ऊतींचं कंपन सुरू होते, त्यावेळेस घोरण्याचा आवाज येऊ लागतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या घोरण्याच्या समस्येमुळे अन्य सदस्यांच्याही झोपेवर परिणाम होतो. तसंच एखादा व्यक्ती रोज घोरत असेल तर गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया (OSA), अपुरी झोप किंवा श्वसन नलिकेतील अडथळे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच घोरण्याच्या समस्यांवर उपाय करावा. 

घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कायम औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. दैनंदिन जीवनामध्ये छोटे-मोठे बदल केल्यास तुमचे घोरणे कमी होऊ शकते. 

घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे?

1. कूस करून झोपा

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, पाठीवर झोपल्यास जीभ मागील बाजूस जाऊन श्वसननलिका आंशिक स्वरुपात बंद होऊ शकते. कुशीवर झोपल्यास श्वसनाचा मार्ग मोकळा होतो, ज्यामुळे घोरण्याचा आवाज येणार नाही.  

2. पूर्ण झोप घ्यावी

अपुऱ्या झोपेमुळे घशाच्या भागातील स्नायूपेशी लवकर सैल होतात, ज्यामुळे घोरण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे नियमित सात ते आठ तासांची झोप घ्यावी. 

3. झोपताना डोकं थोडेसं उंच ठेवा

झोपताना डोक्याखाली ऊशी घ्यावी, डोके किंचितसे उंचावर ठेवल्यास श्वसनाची नलिका मोकळी होईल. पण जास्त जाड स्वरुपातील ऊशी घेऊ नये, यामुळे मानेचे दुखणे वाढेल. 

4. नेजल स्ट्रिप किंवा नेजल डायलेटरचा वापर 

नेजल स्ट्रिपमुळे नाकपुड्या रुंद होतात, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते.

5. मद्यपान करू नका

दारूमुळे घशाच्या भागातील स्नायू सैल होतात, त्यामुळे झोपण्यापूर्वी कमीत कमी तीन तास आधी दारू पिणे टाळावे. 

6. औषधं

झोपेच्या गोळ्यांमुळेही घोरण्याची समस्या वाढू शकते, त्यामुळे अशा पद्धतीच्या औषधांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Surya Namaskar Benefits: 1 दिवसात किती वेळा सूर्य नमस्काराचा सराव करावा? काय आहेत फायदे

(नक्की वाचा: Surya Namaskar Benefits: 1 दिवसात किती वेळा सूर्य नमस्काराचा सराव करावा? काय आहेत फायदे)

7. धूम्रपान 

धूम्रपानाच्या सवयीमुळे घसा आणि नाकाच्या भागामध्ये सूज येते, ज्यामुळे घोरण्याची समस्या वाढू शकते.   

8. वजन नियंत्रणात ठेवा

गळ्याच्या भागामध्ये जास्त फॅट्स जमा झाल्यासही श्वसननलिका अरुंद होऊ शकते, म्हणून शरीराचे वजन जास्त असणाऱ्या लोकांमध्ये घोरण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते.  

Sleep Tips: गाढ झोपेसाठी कोणत्या अवयवाचा मसाज करावा? कोणते अवयव दाबल्यास झोप पटकन येते? वाचा 100% रामबाण उपाय

(नक्की वाचा: Sleep Tips: गाढ झोपेसाठी कोणत्या अवयवाचा मसाज करावा? कोणते अवयव दाबल्यास झोप पटकन येते? वाचा 100% रामबाण उपाय)

9. अ‍ॅलर्जी

अ‍ॅलर्जीमुळे श्वास घेण्यात अडथळे निर्माण होत असल्यास काही लोक तोंडावाटे श्वास घेतात, यामुळेही घोरणे वाढते.  

10. शरीर हायड्रेट ठेवा 

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळेही घोरण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कफची समस्या निर्माण झाल्यास वायुमार्गामध्ये अडथळे निर्माण होतात, यामुळे श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या निर्माण होते, परिणामी घोरण्याचा आवाज येऊ लागतो. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com