Green Tea Vs Black Tea: चहा हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. काही लोकांची दिवसाची सुरुवात चहा प्यायल्याशिवाय होतच नाही. दुधाच्या चहाच्या तुलनेत ग्रीन टी आणि ब्लॅक टी शरीरासाठी अधिक फायदेशीर मानली जाते. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यापासून ते हृदयाचे आरोग्य आणि वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत दोन्ही प्रकारचा चहा पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. संशोधनकर्त्यांच्या मते ग्रीन टी आणि ब्लॅक टी या दोन्हीमध्ये 'पॉलीफेनॉल' नावाचे वनस्पतींपासून मिळणारे नैसर्गिक घटक आढळतात. हे घटक शरीरात तयार होणाऱ्या हानिकारक फ्री रेडिकल्सविरोधात (Free Radicals) लढण्यास मदत करतात. फ्री रेडिकल्स शरीरातील पेशींचे नुकसान करतात आणि दीर्घकाळात अनेक आजारांचा धोका वाढवू शकतात.
ग्रीन टी पिण्याचे फायदे | Green Tea Benefits
ग्रीन टीमध्ये 'कॅटेचिन' (Catechin) नावाचे खास प्रकारचे पॉलीफेनॉल मोठ्या प्रमाणात असते, जे शरीरातील सूज कमी करण्यास आणि ग्लुकोजचा वापर सुधारण्यास मदत करू शकते. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्याच्या बाबतीत ग्रीन टी सहसा अधिक प्रभावी मानली जाते.
(नक्की वाचा : Winter Tips: पावसाळ्यात कीड लागण्यापासून डाळी-तांदूळ सुरक्षित ठेवायचे आहेत? शेफनं सांगितले सोपे किचन हॅक्स)
अनेक संशोधनातील माहितीनुसार यातील कॅटेचिन आणि अन्य अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात. इन्सुलिन हे रक्तातील साखर पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा ब्लड शुगर वाढू लागते. ग्रीन टीमधील घटक ही प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय ग्रीन टीमुळे वजन नियंत्रणात राहते, मेटाबॉलिज्म आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते.

ग्रीन टी पिण्याचे फायदे. Photo Credit: Freepik
ब्लॅक टी पिण्याचे फायदे | Black Tea Benefits
ब्लॅक टीमध्येही अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, यामध्ये थियाफलेव्हिन (Theaflavins) आणि थियारूबिजिन (Thearubigins) यासारखे घटक आढळतात, जे चहाच्या पानाच्या ऑक्सिडेशन (Oxidation) प्रक्रियेदरम्यान तयार होतात. वैद्यकीय संशोधन सांगते की, हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, सूज कमी करण्यास आणि शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात. काही अभ्यासांमध्ये असेही समोर आले आहे की, ब्लॅक टी नियमित प्यायल्यास ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते पण याचे परिणाम ग्रीन टीच्या तुलनेत थोडे कमी दिसून येतात.
(नक्की वाचा : Fatty Liver Food: फॅटी लिव्हरने त्रस्त आहात? काय खावे आणि काय टाळावे? डॉक्टरांनी दिली 5 हेल्दी स्नॅक्सची यादी)
चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?तुम्ही चहा कोणत्या प्रकारे तयार करताय? यावर त्याचे फायदे अवलंबून आहेत. तज्ज्ञांच्या मते ग्रीन टी खूप जास्त उकळू नये. हलक्या कोमट पाण्यात काही मिनिटे राहू दिल्याने त्याचे सक्रिय घटक सुरक्षित राहतात. दुसरीकडे ब्लॅक टी थोडा वेळ गरम पाण्यात ठेवली जाते, जेणेकरून त्याची चव आणि गुणधर्म व्यवस्थित पाण्यात उतरू शकतील.
NOTE: दोन्ही प्रकारचा चहा साखर मिक्स न करता (Without Sugar) प्यावा. जर यामध्ये अतिरिक्त साखर मिसळली तर ब्लड शुगर नियंत्रणाशी संबंधित असणारे फायदे बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world