जाहिरात

Winter Tips: पावसाळ्यात कीड लागण्यापासून डाळी-तांदूळ सुरक्षित ठेवायचे आहेत? शेफनं सांगितले सोपे किचन हॅक्स

Rainy Season Kitchen Hacks: पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे डाळ आणि तांदळाला लवकर कीड किंवा अळ्या लागतात. शेफ पंकज यांनी सांगितलेले सोपे घरगुती उपाय करून धान्य कसे सुरक्षित ठेवावे, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Winter Tips: पावसाळ्यात कीड लागण्यापासून डाळी-तांदूळ सुरक्षित ठेवायचे आहेत? शेफनं सांगितले सोपे  किचन हॅक्स
"Winter Tips: पावसाळ्यात डाळ आणि तांदळाचे कीड लागण्यापासून कसे संरक्षण करावे?"
NDTV

Winter Tips: कडक उन्हाळा आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेपासून वाचण्यासाठी सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. पावसाळा सुरू होताच उष्णतेपासून तर आराम मिळतो, पण आपल्या किचनमधील समस्या वाढतात. या ऋतूत हवेतील दमटपणा (Moisture) खूप वाढतो, ज्यामुळे किचनमधील डब्यांमध्ये ठेवलेल्या डाळी आणि तांदळाला खूप लवकर कीड किंवा अळ्या लागतात. अनेकदा तर महागड्या किराणामालामध्ये जळमटं पडतात, ज्यामुळे पूर्ण धान्य खराब होते आणि ते फेकून द्यावे लागते. 

जर तुम्हीही दरवर्षी पावसाळ्यामध्ये या समस्येने त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सोशल मीडियावर शेफ पंकज यांनी काही सोपे आणि घरगुती उपाय (Kitchen Hacks) शेअर केले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या डाळी आणि तांदूळ कीड लागण्यापासून पूर्णपणे वाचवू शकता.

(नक्की वाचा: Tissue Paper: टिश्यू पेपर पांढराच का असतो? कारण ऐकून पुढच्या वेळी रंगीत टिश्यू वापरताना 10 वेळा विचार कराल)

तांदळाला कीड लागण्यापासून कसे वाचवावे?

शेफच्या मते आपल्या गरम मसाल्यातील तेजपत्ता आणि लवंग हे कीड-अळ्यांचे मोठे शत्रू आहेत. डाळी किंवा तांदळाच्या कंटेनरमध्ये (डब्यात) खाली आणि मध्यभागी काही तेजपत्ता किंवा लवंग टाकून ठेवा. या गरम मसाल्याच्या तीव्र सुवासामुळे डब्यामध्ये कीटक तयार होत नाहीत आणि तुमचा तांदूळ अनेक महिन्यांपर्यंत एकदम फ्रेश राहतो.

पाहा व्हिडीओ

पावसाळ्यात डाळींना कीड लागण्यापासून कसे वाचवावे?

1. थंड आणि कोरडी जागा: किचनमध्ये ठेवलेल्या डाळींना पावसाळ्यात कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर बरणी किंवा डबा कायम नेहमी थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.

2. हवाबंद डबे: डाळींसाठी नेहमी एअर टाइट (हवाबंद) डब्यांचा वापर करा. कारण हवेतील दमटपणा थेट संपर्कात आल्यामुळे डब्यात कीड लवकर लागते.

3. कडुलिंबाची पाने: कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. पावसाळ्याच्या दिवसांत कडुलिंबाची काही पाने चांगल्या प्रकारे वाळवून घ्या. आता ही सुकलेली पाने कापडाच्या एका लहान पोटलीमध्ये बांधून किंवा थेट डाळ-तांदळाच्या डब्यात टाका. यामुळे कीड लागण्याचा धोका पूर्णपणे नाहीसा होईल.

(नक्की वाचा: Swiftlet Saliva Nest: सोन्याहून महाग 'या' चिमणीची लाळ! पांढऱ्या सोन्याचा बाजारात धुमाकूळ, कारण जाणून व्हाल थक्क)

4. हळदीची पोटली: जर तुम्ही डाळीच्या डब्यात हळदीची लहान पोटली करून ठेवली तरीही कीड लागण्यापासून मोठी सुटका मिळू शकते.

5. धान्यांना ऊन दाखवणे: सर्वात चांगला आणि सोपा उपाय म्हणजे ऊन दाखवणे. शक्य होईल तेव्हा डाळी आणि तांदळाला कडक उन्हात थोडा वेळ ठेवून द्यावे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com