जाहिरात

High Blood Pressure Remedy: दोन चमत्कारी ड्रिंक्स! प्याल तर मजा येईल; BP आणि हायपर टेन्शन गायब होईल

प्रसिद्ध योग गुरू डॉ. हंसाजी योगेंद्र (Dr. Hansaji Yogendra) यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर (YouTube Channel) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी 2 अशा नैसर्गिक ड्रिंक्सबद्दल सांगितले आहे, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.

High Blood Pressure Remedy: दोन चमत्कारी ड्रिंक्स! प्याल तर मजा येईल; BP आणि हायपर टेन्शन गायब होईल
मुंबई:

उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनने भारतातील अनेकजण ग्रासलेले आहेत. यावर मात करण्यासाठी महागडी औषधे घेतली जातात, मात्र त्याचा शरीरावर थोडाफार तरी साइड इफेक्ट होत असतोचय या दोन समस्यांवर वेळेत इलाज केला नाही तर हृदयविकाराचा (Heart Diseases) धोका वाढू शकतो. जर तुम्हालाही रक्तदाब (Blood Pressure)  जास्त असण्याची समस्या असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. प्रसिद्ध योग गुरू डॉ. हंसाजी योगेंद्र (Dr. Hansaji Yogendra) यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर (YouTube Channel) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी 2 अशा नैसर्गिक ड्रिंक्सबद्दल सांगितले आहे, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.

( नक्की वाचा: 3 महिन्यांत कमी होईल 20kg वजन, फॅट्स कमी करण्यासाठी फिटनेस कोचने सांगितल्या 10 स्टेप्स )

डॉ. हंसाजी यांनी म्हटलंय की, सामान्यतः सकाळी उठल्यावर रक्तदाब हळूहळू वाढतो, दुपारी तो सर्वाधिक असतो आणि संध्याकाळपर्यंत कमी होतो. रात्री रक्तदाब स्थिर होत जातो. परंतु, ज्यांना हायपरटेन्शनची समस्या असते, त्यांचा रक्तदाब दिवसभर वाढलेला असतो. यापासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदात 2 अत्यंत प्रभावी ड्रिंक्स सांगितली आहेत; एक सकाळसाठी आणि एक संध्याकाळसाठी. ही नैसर्गिक ड्रिंक्स फक्त रक्तदाब नियंत्रित करतात असे नाही तर ती शरीराला पोषणही देतात.

( नक्की वाचा: साखर खाणे पूर्णपणे बंद करण्याचे 5 मोठे दुष्परिणाम, शरीरामध्ये दिसतील ही गंभीर लक्षणे )

आवळा-ओव्याचा काढा  

हा काढा बनवण्यासाठी, एक ताजा आवळा घेऊन त्याचा रस काढा. त्यात एक चमचा कुटलेला ओवा, थोडी हळद आणि  एक चमचा मध घाला. एक कप कोमट पाणी घालून हे मिश्रण चांगले ढवळून घ्या.  तयार झाला आवळा-ओव्याचा काढा.  डॉ. हंसाजी यांनी म्हटलंय की हे ड्रिंक सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने जबरदस्त फायदा होतो. डॉ. हंसाजी यांनी म्हटलंय की आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते, जे रक्तवाहिन्यांचे (Blood Vessels)  कार्य सुधारण्यास मदत करते ज्यामुळे  नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी होण्यास मदत होते. ओव्यामध्ये थायमोल नावाचे तत्व असते, जे कॅल्शियम चॅनेल ब्लॉकरसारखे कार्य करते, यामुळे देखील रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. हळदीमध्ये दाहकता कमी करण्याचे (Anti-Inflammatory) गुणधर्म असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. एकूणच काय तर हे पेय फक्त रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीच नाही तर शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करते. 

ब्रोकोली-बेल पेपर सूप

हे आरोग्यदायी सूप बनवण्यासाठी 1/4 भाग लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिर्ची घ्या. त्यासोबत अर्धे गाजर (Half Carrot), एक टोमॅटो (One Tomato) आणि 3 ते 4 ब्रोकोलीचे (Broccoli) तुकडे घ्या. हे सर्व थोडे ऑलिव्ह ऑईलमध्ये (Olive Oil) लसणासोबत (Garlic) परतून घ्या. नंतर मिश्रण ब्लेंड करून प्युरी बनवा आणि पाण्यात उकळून घ्या. तयार आहे तुमचे ब्रोकोली-बेल पेपर सूप तयार होईल.
शिमला मिर्ची आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर असते, जे हायपरटेन्शन (Hypertension) नियंत्रित करण्यास मदत करते. ब्रोकोलीमध्ये मॅग्नेशियम (Magnesium), पोटॅशियम (Potassium) आणि कॅल्शियम (Calcium) असतात, जे रक्तदाब नियमित ठेवतात. याशिवाय, ऑलिव्ह ऑईलमधील निरोगी फॅट्स (Healthy Fats) विशेषतः डायस्टोलिक प्रेशर (Diastolic Pressure) कमी करतात. त्यामुळे हे सूपदेखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

डॉ. हंसाजी यांनी म्हटलंय की आवळा-ओव्याचे सूप सकाळी आणि ब्रोकोली-बेल पेपर सूप संध्याकाळी प्यायले तर हायपरटेन्शन नियंत्रणात आणणे खूप सोपे होऊ शकते. हे दोन्ही नैसर्गिक उपाय कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमच्या एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com