Sleep Time According To Age: वयोमानानुसार कोणत्या व्यक्तीने किती तास झोपावे, तुम्ही किती वेळ झोपता?

Sleep Time According To Age: वयाच्या हिशेबाने कोणी किती तास झोपावे, जाणून घेऊया तज्ज्ञांकडून माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: वयोमानानुसार किती तास झोपावे?"

Sleep Time According To Age: शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर थकवा येणे, चिडचिड होणे आणि एकाग्रता क्षमतेवरही दुष्परिणाम होऊ शकतात. काही लोकांची तर अशी तक्रार असते किती आठ-नऊ तास झोपून सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटत नाही उलट थकवा जाणवतो. दरम्यान वयोमानानुसार प्रत्येकाने झोपेच्या तासाचे गणित ठरवावे, हे तुम्हाला माहितीये का? ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन वोरा यांनी इंस्टाग्राम हँडलवर झोपेच्या गणिताशी संबंधित व्हिडीओ शेअर केलाय. वयोमानानुसार कोणत्या व्यक्तीने किती तास झोप घेणे आवश्यक आहे, याबाबत महत्त्वाची माहिती डॉक्टरांनी व्हिडीओद्वारे दिलीय.  

नवजात आणि लहान मुले

डॉक्टर वोरा यांनी सांगितले की, नवजात बाळाला (0–3 महिने) सर्वाधिक झोपेची आवश्यक असते. लहान बाळांना दिवसभरात जवळपास 14-17 तास झोपवावे. तर 4-11 महिन्यांच्या बाळांना 12-15 तास आणि 1 ते 2 वर्षांच्या मुलांना 11-14 तास झोपवणे गरजेचे आहे. या वयामध्ये मुलांचा योग्य विकास व्हावा, यासाठी झोप महत्त्वाची भूमिका निभावते.  

बालवाडी आणि शाळेत जाणारी मुले

3 ते 5 वर्षांच्या मुलांनी 10–14 तास झोपावे. यामुळे मूड चांगला राहील आणि शिकण्याची क्षमताही वाढले. तर 6 ते 13 वर्षांच्या मुलांनी 9–11 तास झोपणे आवश्यक आहे. 

Advertisement

(नक्की वाचा: Better Sleep Tips: झोपेतून उठून वारंवार टॉयलेटमध्ये जावं लागतं? झोपण्यापूर्वी करा 2 सोपी कामं, मिळेल गाढ झोप)

किशोरवयीन आणि तरुण मंडळी 

डॉक्टर वोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14–17 वर्षांच्या मुलांनी 8–10 तास, 18–25 वर्षांच्या तरुणांनी सात–नऊ तास झोपणे आवश्यक आहे.  यामुळे मेंदूची कार्यप्रणाली उत्तमरित्या सुरू राहते. 

प्रौढ आणि वयोवृद्ध माणसं

26-64 वर्षांच्या लोकांना सात–नऊ तास झोपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. 65 वर्षांवरील लोकांसाठी 7–8 तासांची झोप पुरेशी मानली जाते.  

(नक्की वाचा: Better Sleep Tips: 5 मिनिटांत येईल गाढ झोप, झोपण्यापूर्वी दुधामध्ये चिमूटभर ही पावडर मिक्स करुन प्या)

लहान मुलांना 

लहान मुलांना जास्त आणि प्रोढांना कमी झोपेची आवश्यकता असते. पुरेशा प्रमाणात झोप घेतली तर थकवा दूर होण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. 

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)