
Water Intake Based On Weight: दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्यावे, असा सल्ला तुम्ही आजवर अनेकदा ऐकला असेल. पण नेमके कोणी किती प्रमाणात पाणी प्यावे, याचे उत्तर प्रत्येकाला माहिती असेलच याची खात्री नाहीय. दिवसभरात नेमके किती लिटर पाणी प्यावे, हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यासही आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. प्रत्येकाने एकसारख्याच प्रमाणात पाणी प्यावे का? याचे तुम्हाला वेगवेगळे उत्तर मिळेल. पण काही सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया...
एका व्यक्तीने किती लिटर पाणी प्यावे? (Water Intake Based On Body Weight)
शारीरिक वजनाच्या हिशेबाने सोपा फॉर्म्युला | Water Intake Formula
जर तुम्ही निरोगी व्यक्ती आहात तर तुमच्या वजनाच्या KG संख्येला 0.03 ने गुणावे.
उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया...समजा तुमचे वजन 70 किलोग्रॅम आहे...
70 × 0.03 = 2.1 लिटर
म्हणजे तुम्ही नियमित जवळपास 2.1 लिटर पाणी पिणे योग्य ठरेल.
(नक्की वाचा: Gut Health News: पोट आणि पचनप्रक्रियेसाठी 2 मसाले ठरतील वरदान, आतड्यांची पटकन होईल स्वच्छता; वाचा उपाय)
तहान आणि लघवीच्या रंगावरुन लक्षणे समजून घ्या
- दुसरा सर्वात सोपा उपाय म्हणजे जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे.
- तहान लागणे हा शरीराने दिलेला पहिला संकेत आहे, आता शरीराला पाण्याची आवश्यकता आहे.
(नक्की वाचा: Guava Leaves Benefits: सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही 2 हिरवी पाने, 6 मोठ्या समस्यांपासून मिळेल सुटका)
तिसरी सोपी पद्धत : लघवीचा रंग
- लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झालीय.
- लघवीचा रंग फिकट पिवळा असेल तर शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आहे.
- लघवीचा रंग पारदर्शी असेल तर तुम्ही आवश्यक प्रमाणात पाणी प्यायले आहात.
कोणत्या आजारात किती प्रमाणात पाणी प्यावे?
किडनीचा आजार : किडनीला सूज आली असेल तर पाणी कमी प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला जातो.
मूतखडा : मूतखड्याच्या समस्येचा सामना करत असाल तर जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
हृदयाचे आरोग्य : हृदयविकारांमध्ये पाणी मर्यादित स्वरुपात प्यावे.
यकृताचे आरोग्य : यकृताच्या विकारांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी पिण्याचे प्रमाण निश्चित केले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world