जाहिरात

Weight Gain Causes: झोप येत नाहीय, मूड खराब आणि वजनही वाढतेय; शरीरात हे व्हिटॅमिन झालंय कमी

Weight Gain Causes: शरीराच्या गंभीर लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करताय का? तर वेळीच सावध व्हा...

Weight Gain Causes: झोप येत नाहीय, मूड खराब आणि वजनही वाढतेय; शरीरात हे व्हिटॅमिन झालंय कमी
"What Is Sunshine Vitamin: सनशाइन व्हिटॅमिन म्हणजे काय?"
Canva

Weight Gain Causes: धकाधकीच्या जीवनात काही लोकांना तास-न्-तास एकाच ठिकाणी बसून कम्प्युटरचा वापर करुन काम करावे लागते. याच कारणामुळे काही लोक वजन वाढीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. डाएट आणि व्यायामाचे रुटीन फॉलो केल्यानंतरही वजन कमी करण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. लठ्ठपणाच्या समस्येमागे खाण्यापिण्याच्या सवयी किंवा लाइफस्टाइलच नव्हे तर शरीरासाठी अतिशय आवश्यक असणाऱ्या 'व्हिटॅमिन डी'ची कमतरताही कारणीभूत असू शकते. 

सनशाइन व्हिटॅमिन म्हणजे काय? | What Is Sunshine Vitamin

आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद मानते की, शरीराचे संतुलन तेव्हाच टिकून राहते जेव्हा शरीराला सूर्याकडून योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते. सूर्यप्रकाशाद्वारे शरीराला मिळणारे व्हिटॅमिन डी हे देखील त्याच ऊर्जेचे एक स्वरुप आहे, यास सनशाइन व्हिटॅमिन असेही म्हटले जाते, कारण हे आपल्या त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून तयार होते.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे | Symptoms Of Vitamin D deficiency

शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाल्यास केवळ हाडेच नव्हे तर शरीराच्या चयापचयाच्या क्षमतेवरही दुष्परिणाम होतात. परिणामी वजन हळूहळू वाढणे, थकवा जाणवणे, झोप कमी येणे आणि वारंवार खाण्याची इच्छा होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

वैज्ञानिकदृष्ट्या व्हिटॅमिन डी शरीरातील सेरोटोनिन नावाचे हार्मोन नियंत्रित करण्यासही मदत करते. सेरोटोनिन नावाच्या हार्मोनमुळे आपल्या मूड आणि भूक या दोन्ही गोष्टींवर परिणाम होतात. शरीरामध्ये याचे प्रमाण अंसतुलित झाल्यास झोप येत नाही, मूडमध्येही वारंवार बदल होतात आणि आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात भूक लागते. 

आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने शरीराचे वजन वाढू लागते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे इंसुलिनचे संतुलनही बिघडू शकते, परिणामी शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते आणि वजन कमी करणं कठीण ठरते.  

आयुर्वेदानुसार शरीरातील अग्नी म्हणजे पचनशक्ती कमकुवत होते, त्यावेळेस विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे वजन आणि आळस दोन्ही गोष्टी वाढतात. सूर्याचा प्रकाश शरीरातील हा अग्नी प्रज्वलित करते म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या शरीराची नैसर्गिक ऊर्जा जागृत करतो. म्हणूनच प्राचीन काळात वैद्य सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेण्याचा सल्ला देत असत. सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे शरीरातील व्हिटॅमिन डी देखील वाढते आणि मानसिकरित्याही ताजेतवाने वाटते. 

शरीरामध्ये 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता निर्माण झाल्यास काय होते? | What Happens If There Is A Deficiency Of Vitamin D In The Body?

  • थकवा जाणवणे
  • हाडे आणि स्नायूपेशींमध्ये वेदना होणे
  • केसगळती होणे
  • वारंवार मूड बदलणे

सूर्यप्रकाशाद्वारे मिळणारी ऊर्जा शरीरापर्यंत पोहोचत नाहीय, हे देखील या गोष्टींचे संकेत असू शकतात. तणाव आणि अपुरी झोप या समस्या निर्माण होत असल्याचे समजून लोक या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण खरंतर शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाली असू शकते. 

Why You Should Stop Eating Rice: 30 दिवस भात खाल्ला नाही, तर काय होईल?

(नक्की वाचा: Why You Should Stop Eating Rice: 30 दिवस भात खाल्ला नाही, तर काय होईल?)

'व्हिटॅमिन डी'ची कमतरता कशी दूर करावी? | How To Overcome Vitamin D Deficiency?

  • सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ बसावे. 
  • डाएटमध्ये संत्र्याचा ज्युस, ओट्स, व्हिटॅमिन डीयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा. 
  • आयुर्वेदामध्ये यासह तिळाचे तेल, आवळा आणि अश्वगंधा यासारख्या औषधी पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.  

Digestive Tips: सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होत नाही? डॉक्टर हंसा योगेंद्र यांच्या 5 टिप्स करा फॉलो

(नक्की वाचा: Digestive Tips: सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होत नाही? डॉक्टर हंसा योगेंद्र यांच्या 5 टिप्स करा फॉलो)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )
Listen to the latest songs, only on JioSaavn.com