जाहिरात

Vitamin D: दुपारच्या उन्हाद्वारे Vitamin D मिळते? किती वाजता, किती वेळ उन्हात बसावे? डॉक्टरांनी दिली माहिती

Vitamin D Benefits: सकाळी की दुपारी, कोणत्या वेळेस उन्हात बसल्यास सूर्यकिरणांद्वारे व्हिटॅमिन डी मिळेल? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती.

Vitamin D: दुपारच्या उन्हाद्वारे Vitamin D मिळते? किती वाजता, किती वेळ उन्हात बसावे? डॉक्टरांनी दिली माहिती
"Vitamin D Benefits: दुपारच्या उन्हामुळे व्हिटॅमिन डी मिळेल?"
Canva

Vitamin D Benefits: आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी हे अतिशय महत्त्वाचा घटक असते. याद्वारे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत आणि हाडे मजबूत होतात, शरीराची कार्यप्रणालीही सुरळीत सुरू राहते. पण देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोक 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेचा सामना करत आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे शरीर आणि उन्हाचा जास्त प्रमाणात संपर्क न होणे. कारण सूर्यप्रकाश हे 'व्हिटॅमिन डी'चे मुख्य स्त्रोत आहे. म्हणूनच तज्ज्ञमंडळींकडून सकाळच्या वेळेस उन्हामध्ये बसण्याचा सल्ला दिला जातो. पण आताच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांना स्वतःसाठी इतकाही वेळ काढणं शक्य नाही. सूर्यप्रकाशाद्वारे व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी कोणत्या वेळेत उन्हात बसावे, किती वेळ उन्हात बसावे? असे प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत असतात. जाणून घेऊया तज्ज्ञांनी दिलेली माहिती... 

व्हिटॅमिन डीबाबत तज्ज्ञांनी काय सांगितले?

प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी यांनी यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये व्हिटॅमिन डीसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगितलीय. डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितले की, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी सूर्यप्रकाशामध्ये बसणं सर्वाधिक फायदेशीर असते. सकाळचे ऊन सौम्य आणि लाभदायक असते. सकाळच्या वेळेस उन्हात बसल्यास त्वचेचंही नुकसान होत नाही. तुम्हाला सकाळच्या वेळेस उन्हात बसण्यासाठी वेळ मिळत नसेल तर दुपारच्या वेळेस किमान 10 मिनिटे तुम्ही उन्हात राहू शकता. साधारणतः सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेदरम्यान सूर्यप्रकाशात बसल्यास शरीरामध्ये 1 हजार ते 2 हजार आंतरराष्ट्रीय युनिट्सपर्यंत (IU) व्हिटॅमिन D तयार होऊ शकते.  

Anjeer Benefits: रोज 1 अंजीर खाल्ले तर काय होईल? सलग 15 दिवस अंजीर खाण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या

(नक्की वाचा: Anjeer Benefits: रोज 1 अंजीर खाल्ले तर काय होईल? सलग 15 दिवस अंजीर खाण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या)

डॉक्टर सेठी यांनी 'व्हिटॅमिन डी'बाबत दिली महत्त्वाची माहिती  

  • व्हिटॅमिन डी हे केवळ व्हिटॅमिन नाहीय तर आपल्या शरीरामध्ये हे एका हार्मोनप्रमाणे कार्य करते. हे व्हिटॅमिन शरीरातील 200 हून अधिक जनुके नियंत्रित करते, म्हणजे कित्येक शारीरिक कार्यप्रणालींमध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.   
  • खाद्यपदार्थांद्वारे व्हिटॅमिन डी अतिशय कमी प्रमाणात मिळते. खाद्यपदार्थांद्वारे व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढणे कठीण आहे. यासाठी अधिक प्रमाणात मासे, अंडी किंवा मशरुमचा डाएटमध्ये समावेश करावा लागेल. शरीर काही मिनिटांत उन्हाद्वारे जितक्या प्रमाणात व्हिटॅमिन डी तयार करते, तितके खाद्यपदार्थांद्वारे तयार होणे अशक्य आहे.  
  • व्हिटॅमिन डीची कमतरता आपल्याला पटकन जाणवत नाही. कित्येक वर्षे शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. यामुळे थकवा येणे, मूड बदलणे, वारंवार संसर्ग होणे यासारखे लक्षण दिसू लागतात. यासाठी व्हिटॅमिन डीशी संबंधित वैद्यकीय तपासणी नक्की करून घ्यावी. 
  • शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असणंही हानिकारक ठरू शकते. तुम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात औषधांचे सेवन करत असाल तर किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतात. दिवसभरासाठी साधारणतः 600 ते 800 IU इतके व्हिटॅमिन डीचे प्रमाण पुरेसे मानले जाते. तरीही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.  

Cardamom Benefits: 15 दिवस 2 वेलची खाल्ल्या तर काय होईल? Doctor Hansa यांनी सांगितल्या 4 मोठ्या गोष्टी

(नक्की वाचा: Cardamom Benefits: 15 दिवस 2 वेलची खाल्ल्या तर काय होईल? Doctor Hansa यांनी सांगितल्या 4 मोठ्या गोष्टी)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com