Better Sleep Tips: 5 मिनिटांत येईल गाढ झोप, झोपण्यापूर्वी दुधामध्ये चिमूटभर ही पावडर मिक्स करुन प्या

Better Sleep Tips: गाढ आणि शांत झोप हवीय का? प्रसिद्ध डॉक्टर सलीम जैदी यांनी यु-ट्यूब चॅनेलवर याबाबतची माहिती शेअर केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Better Sleep Tips: चांगली झोप येण्यासाठी काय करावे?"

Better Sleep Tips: आरोग्य निरोगी राहावे, यासाठी पुरेशा प्रमाणात झोपणे आवश्यक आहे. आताच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश लोक झोप न येण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. यामागील कारणे अनेक असू शकतात. उदाहरणार्थ तणाव, अतिविचार, अयोग्य जीवनशैली, मोबाइलचा जास्त प्रमाणात वापर करणे किंवा कामाचा ताण, यासह असंख्य कारणांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतात. झोप यावी म्हणून काही लोक औषधांचाही आधार घेतात. पण शरीरावर औषधांचे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ लागतात. याऐवजी गाढ झोप येण्याकरिता साधासोपा नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर झोपेशी संबंधित उपाय सांगणारा व्हिडीओ शेअर केलाय.  जाणून घेऊया सविस्तर माहिती...

झोप येत नसल्यास काय करावे?

डॉक्टरांनी रात्री झोपण्यापूर्वी जायफळचे (Nutmeg) सेवन करण्याचा सल्ला दिलाय. 

जायफळचे सेवन करण्याचे फायदे | Nutmug Benefits In Marathi

डॉक्टर जैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुर्वेदानुसार जायफळ हे नैसर्गिक पद्धतीने झोप येण्यास मदत करणारे औषध मानले जाते. यामध्ये मायरोस्टिसिन (Myristicin) नावाचे कम्पाउंड असते, ज्यामुळे मेंदू शांत होण्यास आणि सेरोटोनिन नावाच्या हार्मोनचा शरीरामध्ये स्त्राव होण्यास मदत मिळते. सेरोटोनिनमुळे शरीरात मेलाटोनिन तयार होते, जे झोप येण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. 

जायफळावर करण्यात आलेल्या रीसर्चमधील माहिती

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज रात्री 2 ग्रॅम जायफळ खाल्ल्याने 15 दिवसांत लोकांच्या झोपेची वेळ 3.5 तासांहून वाढून जवळपास 7 तास झाल्याचे रीसर्चमध्ये आढळले. जायफळमुळे चांगली झोप देखील येऊ लागली आणि शरीरावर कोणते दुष्परिणामही झाले नाहीत.   

(नक्की वाचा: जायफळाचे सेवन केल्यास आरोग्यास मिळतील हे जबरदस्त फायदे)

झोप येण्यासाठी जायफळ कसे खावे?

  • डॉक्टर जैदी यांच्या माहितीनुसार, झोपण्यापूर्वी जवळपास 30 मिनिटांपूर्वी ग्लासभर गरम दूध घ्यावे. 
  • दुधामध्ये चिमूटभर (1/4 चमचा किंवा त्याहून कमी) जायफळ पावडर मिक्स करा.  
  • चवीसाठी गूळ मिक्स करू शकता. 
  • एका जागी बसून हळूहळू दूध प्यावे आणि मोबाइल-टीव्ही पाहणे टाळावे. 
  • रुममधील लाइट बंद करुन रिलॅक्स व्हा. यामुळे मेंदू शांत होईल आणि गाढ झोप येईल.  

(नक्की वाचा: Jaiphal Benefits: रोज जायफळ खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतील?)

जायफळाचे सेवन करताना या गोष्टींची काळजी घ्यावी

  • फायदे मिळत असले तरीही जायफळचे अतिरिक्त सेवन करू नये. 
  • जायफळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास चक्कर येणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
  • गर्भवती महिला, लहान मुले, लिव्हर किंवा किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांनी जायफळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  
  • अँटी-डिप्रेसेंट किंवा झोपेसाठी औषध घेत असाल तर जायफळचे सेवन करू नये.  
  • डॉक्टर जैदी यांच्या माहितीनुसार, झोप येण्यासाठी औषधांचा आधार घेणे योग्य नाही. 
  • योग्य प्रमाणात जायफळयुक्त दूध प्यायल्यास चांगली झोप मिळू शकते. 
  • पुरेशा प्रमाणात झोप मिळाल्यास सकाळी उठल्यानंतर फ्रेश देखील वाटेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )