Mexican Mint Benefits: पोटाच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी वरदान आहेत ही हिरवी पाने, जाणून घ्या फायदे

Mexican Mint Benefits: पोटाशी संबंधित समस्या आणि शरीराला आलेली सूज दूर करण्यासाठी डाएटमध्ये या हिरव्या पानांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकते, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Mexican Mint Benefits: मॅक्सिकन मिंटची पाने खाण्याचे फायदे"
Canva

Mexican Mint Benefits: घरामध्ये काही छोट्या औषधी रोपांची लागवड केल्यास कित्येक आजारांपासून सुटका होण्यास मदत मिळू शकते. यापैकी एकच औषधी रोप म्हणजे 'मॅक्सिकन मिंट'. या रोपामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. मॅक्सिकन मिंटची पाने थोडीशी टोकदार आणि जाडी असतात. या रोपाची लागवड करण्यासाठी जास्त जागा लागत नाही तसेच विशेष देखभाल करण्याचीही आवश्यकता भासत नाही. या पानांना ओव्यासारखा सुगंध येतो, या पानांचे योग्य पद्धतीने सेवन केले तर छोट्या-छोट्या आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळते. 

मॅक्सिकन मिंटचे सेवन करण्याचे फायदे | Mexican Mint Benefits In Marathi

मॅक्सिकन मिंटमध्ये अँटी-बायोटिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे संसर्गापासून शरीराचे संरक्षण करतात. सर्दी-खोकला आणि कफ यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास मॅक्सिकन मिंटच्या पानांचा काढा किंवा चहा तयार करून पिऊ शकता. या रोपाची पाने चवीला थोडीशी तिखट असतात. दमा किंवा छातीमध्ये कफ जमा झाल्यास मॅक्सिकन मिंटचा वापर करावा. ही पाने गरम पाण्यामध्ये उकळून पिऊ शकता किंवा त्या पाण्याची वाफ घेऊ शकता. 

(नक्की वाचा: Betel Leaves Benefits: 5 रुपयांचे हिरवेगार पान तुमच्यासाठी अमृतासमान ठरेल, वर्षानुवर्षे शरीर राहील तरुण)

पोटाचे निरोगी आरोग्य

पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मॅक्सिकन मिंटची पाने लाभदायक ठरू शकतात. गॅस, अपचन आणि पचनप्रक्रिया यासारख्या समस्यांवर मॅक्सिकन मिंट औषधाप्रमाणे काम करते. नियमित मॅक्सिकन मिंटच्या पानांचे सेवन केल्यास गॅसची समस्या दूर होईल आणि पचनप्रक्रिया सुधारेल, शिवाय भूक देखील लागेल. अँटी-बायोटिक गुणधर्मांमुळे शरीरावर जखम भरून निघण्यासही मदत मिळते.   

Advertisement

(नक्की वाचा: Health Benefits Of Eating Curd Daily: सलग 30 दिवस दही खाल्ल्यास मिळतील हे 5 मोठे फायदे)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)