जाहिरात

Health News: मासिक पाळीत अननस खाणे चांगले की वाईट? एक्सपर्टची नवी माहिती

अननस खाण्याने काही फायदे आणि तोटे आहेत का याबाबतही त्यांनी सांगितलं आहे.

Health News: मासिक पाळीत अननस खाणे चांगले की वाईट? एक्सपर्टची नवी माहिती
  • मासिक पाळीदरम्यान अननसामध्ये असलेला ब्रोमेलिन हा नैसर्गिक एन्झाइम स्नायूंना आराम देऊन वेदना कमी करतो
  • अननसावर दालचिनीची पूड टाकल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि मासिक पाळीच्या वेदनांमध्ये अधिक आराम मिळतो
  • डार्क चॉकलेटमध्ये असलेला मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतो आणि मूड सुधारण्यास मदत करतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Is pineapple good for you on your period: मासिक पाळी (Periods) ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी या काळात अनेक महिलांना तीव्र वेदना, पेटके (क्रॅम्प्स), थकवा आणि मूड-स्विंग्ज (Mood Swings) यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या तक्रारी कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सुचवले जातात. याच उपायांपैकी एक म्हणजे अननस (Pineapple) खाणे हे आहे. पण या काळात अननस खाणे हे वैज्ञानिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे, याबद्दल न्यूट्रिशनिस्ट खुशी छाबडा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ती तुम्हालाही फायद्याची ठरू शकते. अननस खाण्याने काही फायदे आणि तोटे आहेत का याबाबतही त्यांनी सांगितलं आहे. 

अननस (Pineapple) आणि ब्रोमेलिनचे कार्य
न्यूट्रिशनिस्ट छाबडा यांच्या मते, मासिक पाळीदरम्यान योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. अननस हे एक अत्यंत उपयुक्त फळ आहे. अननसमध्ये ब्रोमेलिन (Bromelain) नावाचे नैसर्गिक एन्झाइम (Enzyme) असते. हे एन्झाइम गर्भाशयाच्या स्नायूंना (Muscles) आराम देते. ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणारे पेल्विक (Pelvic) वेदना आणि पेटके कमी होतात. यामुळे त्वरित आराम मिळतो आणि शरीरात ताकद येते. ज्यामुळे थकवा जाणवत नाही.

दालचिनीमुळे फायदा दुप्पट
अननसावर चिमूटभर दालचिनीची (Cinnamon) पूड टाकून खाल्ल्यास त्याचा फायदा अधिक वाढतो. दालचिनीमध्ये सिनेमैल्डिहाइड (Cinnamaldehyde) नावाचा घटक असतो, जो रक्ताचा प्रवाह (Blood Flow) सुधारतो. सुधारित रक्तप्रवाह नैसर्गिकरित्या पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे जर अननसावर दालचिनीची पावडर टाकली तर त्यातून मासिक पाळी दरम्यान महिलांना वेदनेपासून मोठा फायदा होतो. 

इतर महत्त्वाचे उपाय

अननसाव्यतिरिक्त, छाबडा यांनी इतर काही सोप्या गोष्टीही सुचवल्या आहेत.

  • 70% डार्क चॉकलेट: यात मॅग्नेशियम असते, जे स्नायूंना आराम देते आणि मूड सुधारते.
  • हायड्रेशन (Hydration): पुरेसे पाणी प्यायल्याने ब्लोटिंग (Bloating) आणि थकवा कमी होतो.
  • बीज (Seeds): भोपळा , जवस आणि तीळ  या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक असते. जे हार्मोन्स संतुलित ठेवतात.
  • आले आणि दालचिनीचे पाणी: हे पेय वेदना कमी करते आणि पाळीचा प्रवाह (Period Flow) सुधारते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com