जाहिरात

Singhara Benefits: 5 लोकांच्या आरोग्यासाठी शिंगाडे खाणे ठरेल वरदान, जाणून घ्या जबरदस्त फायदे

Singhara Benefits: शिंगाड्यामध्ये व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, फायबर आणि अँटी-ऑक्सिंड्टसचा मोठा साठा आहे. महत्त्वाचे म्हणजे हे फळ फॅट्स आणि ग्लुटेन फ्री आहे.

Singhara Benefits: 5 लोकांच्या आरोग्यासाठी शिंगाडे खाणे ठरेल वरदान, जाणून घ्या जबरदस्त फायदे
"Singhara Benefits: शिंगाडा खाणे आरोग्यासाठी वरदान ठरेल"
Canva

Singhara Benefits: शिंगाडा फळामध्ये व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. हे फळ तुम्ही कच्चे किंवा उकडूनही खाऊ  शकता. विशेष म्हणजे हे फळ ग्लुटेन आणि फॅट्स फ्री आहे. शिंगाडे खाण्याचे फायदे जाणून घेऊया...

शिंगाडे खाण्याचे फायदे (Health Benefits of Singhara)

1. पचनप्रक्रिया (Healthy Digestion)

शिंगाड्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल. तसेच हे फळ खाल्ल्यानंतर पोट जड झाल्यासारखे वाटत नाही. 

2. शरीर थंड आणि हायड्रेटेड राहते (Provides Cooling And Hydration)

शिंगाड्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. थकवा, अस्वस्थता आणि उष्णता जाणवत असल्यास शिंगाडा खाल्ल्यास आराम मिळेल. 

3.  हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर (Strengthens your heart)

शिंगाड्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते, यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. 

4. शरीराला ऊर्जा मिळते (Boosts energy gently)

शिंगाड्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे घटक आहे, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 

5. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल (Supports immunity)

व्हिटॅमिन सीमुळे शरीराचे कित्येक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

Uric Acid Treatment: युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे, काय टाळावे; वाचा संपूर्ण यादी

(नक्की वाचा: Uric Acid Treatment: युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे, काय टाळावे; वाचा संपूर्ण यादी)

शिंगाड्याची कढी रेसिपी
सामग्री:

  • 15-20 शिंगाडे
  • दोन मध्यम आकाराचे कांदे
  • चवीनुसार मीठ 
  • दोन मोठे चमचे तेल
  • एक छोटा चमचा जीरे
  • एक मोठा चमचा आल्या-लसणाची पेस्ट 
  • अर्धा कप टोमॅटो प्युरी 
  • एक मोठा चमचा धण्याचे पावडर
  • एक छोटा चमचा जिऱ्याची पावडर 
  • एक छोटा चमचा लाल तिखट पावडर 
  • अर्धा चमचा हळद पावडर 
  • दोन मोठे चमचे काजू पेस्ट 
  • अर्धा छोटा चमचा गरम मसाला पावडर
  • एक छोचा चमचा कसुरी मेथी
  • दोन मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर 
  • दोन मोठे चमचा ताजे क्रीम 
  • अर्धा लिंबू 

Beetroot Juice Benefits: सलग 15 दिवस बीट ज्युस प्यायल्यास काय होईल? या 5 लोकांना मिळतील मोठे लाभ

(नक्की वाचा: Beetroot Juice Benefits: सलग 15 दिवस बीट ज्युस प्यायल्यास काय होईल? या 5 लोकांना मिळतील मोठे लाभ)

शिंगाडा कढीची पाककृती 

1. कुकरमध्ये अर्ध्या कप पाण्यामध्ये शिंगाडे उकडून घ्या. 

2. कुकर थंड झाल्यानंतर शिंगाडे बाहेर काढा आणि थंड होऊ द्यावे. यानंतर शिंगाड्यांची साल काढा. कांदा चिरून घ्या.

3. एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा, त्यामध्ये जीरे परतून घ्या, त्यानंतर कापलेला कांदा परतून घ्यावा.

4. आले-लसणाची पेस्ट मिक्स करा आणि दोन मिनिटे सर्व सामग्री परतून घ्यावी. आता टोमॅटो पेस्ट मिक्स करा. 

5. यानंतर धणे पावडर, जीरे पावडर, लाल तिखट, हळद आणि काजू पेस्ट मिक्स करा. 

6. अर्धा कप पाणी, मीठ आणि शिंगाडे मिक्स करून सर्व सामग्री एकजीव करून घ्यावा. गरम मसाला आणि कसुरी मेथी मिक्स करून घ्या. 

7. शिंगाडा कढी तयार झाल्यानंतर वरुन लिंबाचा रस, कोथिंबीर आणि ताजे क्रीम मिक्स करावी.  

8. गरमागरम शिंगाडा कढीचा आस्वाद घ्यावा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com