
Uric Acid Treatment: युरिक अॅसिड हा आपल्या शरीरातील एक टाकाऊ पदार्थ आहे, जो लघवीद्वारे शरीराबाहेर फेकला जातो. पण युरिक अॅसिड शरीरातून बाहेर फेकले न गेल्यास तसेच याची पातळी वाढल्यास शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी आणि सांध्यांवर सूज येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. ही समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश कमी करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करणं टाळावे, याबाबत माहिती जाणून घेऊया...
युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास कोणकोणत्या डाळींचे सेवन करावे? (Uric Acid Diet)
मसूर डाळ
युरिक अॅसिडच्या समस्येचा सामना करत असाल तर मसूर डाळीचे मर्यादित स्वरुपात सेवन करावे. डाळीचे पचन व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी डाळ भिजवून त्यानंतर शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. मसूरचा डाळ, सूप किंवा भाज्यांमध्ये समावेश करू शकता. पण याचे मर्यादित स्वरुपातच सेवन करावे, हे लक्षात ठेवा.
काळे चणे
युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास काळ्या चण्यांचे सेवन करू शकता, जे आरोग्यासाठी पोषक मानले जातात. काळ्या चण्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे, पण काळे चणे योग्य वेळ भिजत ठेवा आणि त्यानंतर शिजवून खा. हा पदार्थही मर्यादित स्वरुपातच खाण्याचा सल्ला दिला जातो.
(नक्की वाचा: Acharya Balkrishna यांनी वाढलेल्या Uric Acid वर सांगितला उपाय, या जादुई औषधामुळे शरीर होईल डिटॉक्स)
मूग डाळ
युरिक अॅसिडची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी मूग डाळ खाणे रामबाण उपाय मानला जातो. मूग डाळीचे पचन सहजरित्या होते, यातील घटक शरीरामध्ये युरिक अॅसिड तयार होण्यास कारणीभूत असणारी तत्त्व कमी करण्याचे काम करतात.
(नक्की वाचा: Uric Acid Control Roti: युरिक अॅसिड नसांमधून बाहेर खेचून काढेल या पिठाची भाकरी, या लोकांनी नक्की करावे सेवन)
कोणत्या डाळींचे सेवन करणं टाळावे?
चण्याची डाळ, तूर डाळ आणि राजमा यासारख्या डाळींमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. प्युरिन हे शरीराच्या पेशींमध्ये आढळणारे एक नैसर्गिक कम्पाउंड आहे. जे शरीरामध्ये युरिक अॅसिडची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरते. म्हणून या डाळींचा डाएटमध्ये समावेश करणं टाळावे. या डाळींचे मर्यादित प्रमाणातच सेवन करावे. युरिक अॅसिडच्या समस्येचा सामना करत असाल तर तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच डाळी भिजवून खाल्ल्यास त्यातील प्युरिन कम्पाउंडचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world