
Beetroot Juice Benefits In Marathi: बीट हे एक कंदमूळ आहे, जे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. बीटचा डाएटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करू शकता. बीट ज्युस पिणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सलग 15 दिवस बीट ज्युस प्यायल्यास शरीराला कित्येक लाभ मिळतील. बीटमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, लोह, फॉलेट, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी यासह कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
घरच्या घरी बीट ज्युस कसा तयार करावा? (How To Make Beetroot Juice At Home)
सामग्री :
- बीट
- पाणी
- लिंबाचा रस (पर्यायी)
- साखर (पर्यायी)
बीट ज्युस तयार करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम बीट स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यावरील साल काढा.
- बिटाचे छोटे-छोटे तुकडे करा आणि ज्युसर किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून ज्युस काढावा.
- ज्युस जाडसर वाटत असल्यास त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करावे.
- चवीसाठी लिंबाचा रस आणि थोडीशी साखरही मिक्स करू शकता.
बीट ज्युस पिण्याचे फायदे -(Benefits of Drinking Beetroot Juice)
1. यकृत
बीट ज्युस प्यायल्यास यकृताचे संरक्षण होते, यकृताला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Bad Cholesterol Control Tips: दह्यात केवळ एक गोष्ट मिक्स करुन खा, खराब कोलेस्टेरॉल पटकन होईल कमी; वाचा उपाय)
2. त्वचाबीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळेल.
3. ऊर्जाशरीरामध्ये तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवत असल्यास बीट ज्युस प्यावा.
4. लठ्ठपणाबीट ज्युसमध्ये कॅलरी आणि फॅट्सचे प्रमाण कमी तर फायबरचे प्रमाण जास्त असते; वेटलॉस करायचं असेल तर डाएटमध्ये बीट ज्युसचा समावेश करावा.
(नक्की वाचा: Triphala Powder Benefits: रात्री झोपण्यापूर्वी दुधात त्रिफळ चूर्ण मिक्स करुन प्या, 4 समस्यांपासून मिळेल सुटका)
5. कोलेस्टेरॉलबीटमध्ये फायटोन्युट्रिएंट्सचा समावेश आहे, यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world