जाहिरात

Drinking Black Coffee On Empty Stomach Benefits: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यास काय होते?

Drinking Black Coffee On Empty Stomach Benefits: दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफी पिऊन केल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेऊया...

Drinking Black Coffee On Empty Stomach Benefits: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यास काय होते?
"Drinking Black Coffee On Empty Stomach Benefits: ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे"
Canva

Drinking Black Coffee On Empty Stomach Benefits: सकाळी उठल्यानंतर बहुतांश लोक दिवसाची सुरुवात कॉफी किंवा चहा पिऊन करतात. पण चहा आणि दुधाची कॉफी दोन्ही पेय आरोग्यासाठी हानिकारक आहेत. याऐवजी तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता. ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणंय. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यास आरोग्यावर कोणकोणते परिणाम होतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

ब्लॅक कॉफीबाबत न्युट्रिशनिस्टने काय सांगितलं?

प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी इन्स्टाग्राम हँडलवर ब्लॅक कॉफीशी संबंधित व्हिडीओ शेअर केलाय. दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफी पिऊन केल्यास आरोग्यास तीन जबरदस्त फायदे मिळतील, अशी माहिती न्युट्रिशनिस्टने दिलीय.

1. शरीराची ऊर्जा आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळते

दीपशिखा जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ब्लॅक कॉफी प्यायल्यास कामामध्ये लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळते. कॉफीमधील कॅफिन मेंदूला सक्रिय ठेवण्याचे काम करते आणि शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते. सकाळी उठल्यानंतर आळस किंवा थकवा जाणवत असेल तर एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटू शकते. 

2. पचनसंस्था

ब्लॅक कॉफीमुळे शरीराला ऊर्जाही मिळते तसेच शरीराची पचनसंस्था देखील सुधारते. यातील पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे तत्त्व अँटी-ऑक्सिडंट्सप्रमाणे काम करतात. ही पोषणतत्त्वं आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांच्या निर्मितीस मदत करतात, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. यामुळे पोट फुगणे, गॅस यासारख्या समस्या कमी होऊ शकतात. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, पोट स्वच्छ होत नसेल तर ब्लॅक कॉफी पिऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.  

(नक्की वाचा:Benefits Of Black Coffee For Liver: दिवसभरात 3-4 कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास Liverवर काय परिणाम होतील)

3. मेंदूसाठी फायदेशीर  

ब्लॅक कॉफी पिणे यकृताच्या आरोग्यासाठी चांगले असते, अशीही माहिती दीपशिखा जैन यांनी दिली. कॉफीतील तत्त्व यकृताला आलेली सूज कमी करण्यास आणि यकृताची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत करतात. याशिवाय ब्लॅक कॉफीतील अँटी-ऑक्सिडंट्समुळे मेंदूचे आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते. काही रीसर्चमधील माहितीनुसार, नियमित स्वरुपात मर्यादित प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्यास मेंदूचे कार्य अधिक चांगले होते.  

(नक्की वाचा: Black Coffee With Ghee: ब्लॅक कॉफीमध्ये 1 चमचा तूप मिक्स करुन पिण्याचे फायदे)

या गोष्टींची काळजी घ्या

दिवसाची सुरुवात उत्साह आणि ऊर्जेने करायची असल्यास रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिऊ शकता. पण मर्यादित प्रमाणातच कॉफी प्यावी. अन्यथा अ‍ॅसिडिटी, डिहायड्रेशन किंवा झोपेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. दिवसभरात एक किंवा दोन कप कॉफी पिणे पुरेसे आहे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com